ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️४ मार्च “लाईनमनदिन” महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. ०४ मार्च २०२६:-राज्याला व देशाला प्रगतीच्या शिखरावर पोहोचोवीणाऱ्या व जनतेच्या जीवनात प्रकाश पोहोचवीणाऱ्या- वीजयंत्रणेत अदृश्य असलेल्या ‘ विजेला ‘ सुरळीत ठेवण्यासाठी विजपुरवठा अबाधित ठेवण्यासाठी, अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वीजक्षेत्रातील महिला व पुरुष तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अर्थात लाईनमनचा गौरव करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि. ४ मार्च हा दिवस ‘लाईनमन दिन’ म्हणून देशभरात तदवतच महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलातील सर्व २९ उपविभागात साजरा करण्यात आला .
मुख्य अभियंता श्री.हरीश गजबे, चंद्रपूर परिमंडळ आणि श्रीमती संध्या चिवंडे, अधिक्षक अभियंता चंद्रपूर मंडळ यांनी सर्वप्रथम सभागृहाच्या प्रवेशद्वारात उभे राहून सर्व लाईनमन बांधवांचे पुष्प देऊन स्वागत केले. आणि सर्वांना लाईनमन दिनाच्या शुभेच्छा देत समृद्धीचे,विकासाचे,नाते प्रकाशाचे, ग्राहक समाधान हेच ध्येय महावितरणचे’ अशा शब्दांनी सदर कार्यक्रमाला सुरुवात झाली. आयोजित कार्यक्रमांमध्ये सर्वांना वीजसुरक्षेची शपथ देण्यात आली.”महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहात ! जनमित्र हे ऊन, वारा, पाऊस तसेच इतर अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी चोवीस तास वर्षाचे ३६५ दिवस अविरत सेवा देतात.कधी,चंद्रपूरच्या कडकडते उन्ह अंगावर झेलत तर पुरात पोहून जात,धो- धो पावसात कर्तव्य पार पाडतात.चंद्रपूर जिल्ह्याच्या रानावनात, गडचिरोली जिल्हा यासारख्या दुर्गाम-अती-दुर्गम आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीत महावितरणचे ‘आधारस्तंभ ‘-जनतेच्या जीवनात प्रकाश पोहोचवीतात याचा मला सार्थ अभिमान आहे. आपले जीवनमानाची काळजी घ्या व दुरुस्ती कामात सुरक्षेशी तडजोड करू नका. कारण तुमची वाट घरी तुमचा परिवार पाहत असतो तर, महावितरणसाठी, महावितरणचा तुम्ही महत्वाचा ‘ दुवा ‘आहात “,असे ते म्हणाले.
श्रीमती संध्या चिवंडे,अधीक्षक अभियंता, चंद्रपूर प्रविभाग यांनी लाईनमन दिनानिमित्त लाईनमन दिवसाच्या सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व नवनवीत योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अभियंते यांना निर्देश देऊन चंद्रपूर मंडळांतर्गत वीज बिल वसुलीचे लक्ष्य गाठण्याकरिता मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास श्री. चंद्रशेखर दाव्हेकर, कार्यकारी अभियंता, चंद्रपूर विभाग, श्री. योगेंद्र निचत, कार्यकारी अभियंता, चाचणी विभाग चंद्रपूर, श्री. विकास शहाडे, कार्यकारी अभियंता (प्रशासन), श्री. विशाल पिपरे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, चंद्रपूर परिमंडळ, श्री राकेश बोरिवार, वरीष्ठ व्यवस्थापक (विवले), चंद्रपूर मंडळ हे उपस्थित होते. लाईनमन दिनानिमित्त चंद्रपूर मंडळा अंतर्गत असलेले तांत्रिक कर्मचारी विजय इंगोले, सरोजिनी लोखंडे, रोशना कामतवार, आणि सुमेध वनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
‘लाईनमन’, प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित, या ‘लाईनमन-दिनी’ उपविभाग १,२,3,४ अंतर्गत सर्व अभियंते, कर्मचारी हे उपस्थित होते. तसेच श्री. मधुसुदन रुंगठा, औदयोगिक संघटनेचे अध्यक्ष, श्री. दिलीप वावरे, कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष उपस्थित होते. श्री. पुंडलिक वणवे आणि डॉ. अनिष नायर यांनी सुरक्षा विषयी मार्गदर्शन केले.
चंद्रपूर, बल्लारशा, वरोरा, गडचिरोली, आलापल्ली, व ब्रम्हपुरी या ठिकाणी लाईनमन दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला व सर्वांनी सुरक्षिततेची शपथ घेतली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.