▪️अचानक आग लागल्याने दुचाकी जळून खाग..!
▪️खरपुंडी येथिल घटना, दीड लाखांचे नुकसान..!
*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्हा मुख्यालयापासुन पाच की. मी. अंतरावर असलेल्या खरपुंडी येथिल हिरा पंढरी निकोडे यांच्या घराला उजव्या बाजुने लागून असलेल्या चाफ्याला सोमवारला रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास अचानकपने आग लागली यात होंडा कंपनीची एम एच ३३ झेड २६४९ या क्रमांकाची दुचाकी जळून खाक झाली
ही दुचाकी खरपुंडी येथिल रहिवासी हिराजी निकोडे यांच्या मालकीची आहे दुचाकी सोबतसच एक फवारणी पंप व ईतर किरकोळ साहित्य असे जवळपास दीड लाख रूपयांचे नुकसान झाले निकोडे यांनी २०१९ मध्य ही दुचाकी खरेदी केली होती ते या दुचाकीवर घरचा भाजिपाला विकण्यासाठी गडचिरोली येथिल गुजरी मध्ये आणत होते दुचाकी जळून खाक झाल्याने त्यांच्यापुढे संकट उभे ठाकले आहे नूकसान भरपाई देण्याची मागणी निकोडे यांनी केली आहे.



