ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️पर्यावरण आणि मानवी जीवतास धोका निर्माण करणारा नायलाॅन माजा जप्त चमोर्शी पुलिसांची कामगिरी आरोपीस केली अटक

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : सध्या मकर संक्रांतिच्या पार्व्श्रभूमीवर पतंग उडवण्यासाठी नायलाॅन मांजाचा सर्रास वापरहोत असल्याचे दिसुन येत आहे हा मांजा पर्यावरण आणी मानवी जीवनासाठी अत्यंत घातक असल्यानेशासनानेत्यावर बंदी घातली आहे याच अनुषंगाने चमोर्शी पुलिस स्टेशनचे पुलिस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत अवैध नायलाॅन मांजा विक्री करणान्यांवर कारवाई केली आहे
चमोर्शी येथल गव्हार मोहल्ला भागात आरोपी विशाल अनील एनुगवार (२०) हाआपल्या राहत्या घरी प्रतिबंधित नायलाॅन मांजा बाळगुन त्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्वरित सापळा रचुन धाड टाकली असता आरोपीकडे शासनाने बंदी घातलेला साठा आढळून आला तसेच या गुन्हात आरोपीला माल पुरवणारा दुसरा आरोपी सुदर्शन चंद्रकांत लेटरे (२२) करण्यात आले आहे जप्त केलेला मुद्दे माल पुलिसांनी घटनास्थळावरून एकूण ६००० रुपये किमतीचा मुद्दे माल जप्त केला आहे
नागरिकांचा जीव धोक्यात घालणान्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी चमोर्शी पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवली आहे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी लोकांचा जीव धोक्यात घालणाय्या विक्रेत्यांना या कारवाई मुळे चांगलाच चाप बसला आहे
सदर करवाई पोलिस निरीक्षक दीपक डोंब यांच्या नेतृत्वाखाली, तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजू वाघमारे, फिर्यादी पो. शि. सुदर्शन कुत्तरमारे, म. पो. ह. वा. अर्चना रणदिवे आणि पथकाने पार पडली आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता ॅ( ए- २०२३ ) कमल २२३, ३(५) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यत आला आहे
चामोर्शी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नायलाॅन मांजाचा वापर टाळून सुरक्षित मकर संक्रांत साजरी करावी तसेच कुठेही अवैध विक्री होत असल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क साधावा असेही आवाहन चामोर्शी पोलिसांनी केले या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजू वाघमारे करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.