▪️एक दिवसीय उपविभागीय क्रिकेट सामन्यात जुन्नर पोलीस स्टेशनचा प्रथम क्रमांक..
▪️पोलीस हवलदार संतोष पठारे, गोविंद केंद्रे यांची जोरदार फटके बाजी..

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
आळेफाटा – ( इंडिया 24 न्युज ) : जुन्नर तालुक्यातील चारही पोलीस स्टेशन अंतर्गत नारायणगाव या ठिकाणी एक दिवसीय उपविभागीय क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन नारायणगाव पोलीस स्टेशन यांनी केले होते. खाकी वर्दीतील पोलीस म्हटलं का कायम बंदोबस्त ताणतणावाचे वातावरण परंतु यातूनही आपली शरीर दृष्टी चांगली रहावी आणि खिलाडू वृत्ती आपल्यातील कमी होऊ नये ती सतत प्रेरणा देत राहावी या उद्देशाने नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सोबत क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते.
यावेळी जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी देखील त्या ठिकाणी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.या क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, उपनिरीक्षक जगदीश पाटील, सोमशेखर शेटे, विनोद धुर्वे, रघुनाथ शिंदे, जलजीवन सम्राट हर्षल वाजगे,जालिंदर खैरे,वकील केतन कावळे, सचिन डोळस
सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके, अशपाक पटेल, वैद्यकीय अधिकारी महादेव वाणी
यांनी देखील या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली. या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात जुन्नर पोलीस स्टेशन प्रथम,द्वितीय नारायणगाव , तृतीय ओतूर तर चतुर्थ क्रमांक आळेफाटा पोलीस स्टेशनने मिळवला.त्याच बरोबर सामनावीर पोलीस नाईक संतोष पठारे , मालिका वीर गोविंद केंद्रे हे ठरले तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून पोलीस हवलदार पंकज पारखे ,उत्कृष्ट गोलंदाज विनोद पवार यांचा देखील सन्मान करत विजेत्या टीमला बक्षीस म्हणून चषक व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.



