▪️ट्रॅफिक पोलिसांनी दाखवला प्रामाणिकपणा व कर्तव्यदक्षता..
▪️रस्त्यावर पडलेली ₹१५,०००/-रोख रक्कम संबंधित व्यापाऱ्यास केली सुखरूप परत..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपूर येथील वाहतुक पोलीस हवालदार सुभाष जाधव (ब.नं. १९४९) हे चंद्रपूर शहरातील कस्तुरबा चौक येथील सिग्नल पॉईंटवर नियमित वाहतुक नियमन कर्तव्यावर हजर होते.
कर्तव्यावर असताना नागपूर येथील एक व्यापारी ऑटोने जात असताना, त्यांच्या पिशवीतून ₹१५,०००/- (अक्षरी पंधरा हजार रुपये) रोख रक्कम कस्तुरबा चौक सिग्नल जवळील रस्त्यावर पडली. ही बाब कर्तव्यावर असलेले वाहतुक पोलीस हवालदार सुभाष जाधव यांच्या तात्काळ निदर्शनास आली.
पोलीस हवालदार सुभाष जाधव यांनी प्रसंगावधान व तत्परता दाखवून संबंधित ऑटोला थांबविले. त्यानंतर पडलेल्या रकमेबाबत व व्यापाऱ्याच्या ओळखीबाबत पूर्ण शहानिशा व खात्री केली. खात्री पटल्यानंतर माजी नगरसेवक (काँग्रेस पार्टी) श्री. रामु तिवारी यांच्या समक्ष सदर ₹१५,०००/- ची रोख रक्कम संबंधित व्यापाऱ्यास सन्मानाने व सुखरूप परत करण्यात आली.
सत्कृत्य व उल्लेखनीय कामगिरीः कामगिरी करणारे अंमलदारः पोलीस हवालदार सुभाष जाधव (ब.नं. १९४९), वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपूर. पोलीस हवालदार जाधव यांच्या या प्रामाणिकपणा, सतर्कता व कर्तव्यदक्षतेबद्दल उपस्थित नागरिकांनी व पोलीस प्रशासनाने त्यांचे विशेष कौतुक केले आहे.



