▪️सोनसरी आश्रमशाळेत शिकणाऱ्या कु. रानू कृष्णा हलामी या निरागस विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यू..
▪️राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. डॉ. अशोक उईके यांच्यासमवेत रानूच्या शोकाकुल कुटुंबीयांची सांत्वन..

श्री. उज्वल देवनाथ :
गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. एका चिमुकल्या जीवाचे असे अकाली निघून जाणे अत्यंत वेदनादायी आहे. या दुःखाला शब्दांत व्यक्त करणेही कठीण आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. डॉ. अशोक उईके यांच्यासमवेत रानूच्या शोकाकुल कुटुंबीयांची सांत्वन. भेट घेऊन त्यांचे दुःख जाणून घेतले व त्यांना धीर दिला. आपल्या काळजाच्या तुकड्याला गमावण्याचे दुःख किती असह्य असेल, याची कल्पनाही करवत नाही. या कठीण प्रसंगी हलामी कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
यावेळी माजी आमदार कृष्णाजी गजबे, माजी आमदार डॉ नामदेवरावजी उसेंडी, भाजप कुरखेडा तालुकाध्यक्ष चांगदेवजी फाये, पोलिस अधीक्षक एम अरुण, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी एम. अरुण, व प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.



