आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️वाघाच्या हल्ल्यात चिंचोली येथील गुराखी ठार..

 

डॉ. आनंदराव हरी कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. 9403179727

मूल – ( इंडिया 24न्यूज ) : मूल तालुक्यातील काटवन जंगलातील कक्ष क्र. 756 मध्ये शेळ्या चरण्याकरिता गेलेल्या चिंचोली येथील देवाजी वारलू राऊत (वय 50वर्ष )यांचेवर हल्ला करून वाघाने त्यांचा बळी घेतला. ही घटना संध्या. 4.50वाजताचे दरम्यान घडली. घटनेची माहिती होताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतक देवाजी राऊत यांचे पार्थिव लागलीच उपजिल्हा रुग्णालय मूल येथे शवविच्छेदन करिता पाठवीन्यात आले. घटनास्थळी वनपरीक्षेत्र अधिकारी कारेकर साहेब, क्षेत्राधिकारी वर्गं टिवारसाहेब,वनरक्षक परचाके, बुरांडे यांनी भेट देऊन पाहणी केली.मृतक देवाजी राऊत यांच्या कुटुंबियांना 20 हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली.
या परिसरात यापूर्वीही वाघाने हल्ला करून अनेक जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. वनधिकाऱ्यांनी वाघांचा तसेच वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.