आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, सप्टेंबर महिन्याचे पैसे या तारखेला होणार जमा..!

सुबोध सावंत – मुंबई विभागीय प्रतिनिधी

मुंबई : (इंडिया 24 न्यूज ) – ज्या महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे 3000 रुपये जमा झाले आहे. त्यांच्या खात्यात आता 1500 रुपये जमा होणार आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केला आहे. त्यांना तीन महिन्याचे 4500 रुपये मिळणार आहे. हा हप्ता कधी येणार याकडे लाडक्या बहि‍णींचे लक्ष आहे

या तारखेला येऊ शकतात लाडकी बहीण योजनेचे पैसे.
मीडिया रिपोर्टनुसार, 19 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीत महिलांच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात. याबाबत अजूनही कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु या महिन्यात पैसे जमा होणार आहेत, असं सांगण्यात आलं आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. या योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. आता महिला सप्टेंबर महिना अखेरपर्यंत अर्ज करु शकणार आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.