आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️सामाजिक सभागृह ठरेल ऐक्याचे प्रतिक – ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास..

▪️विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण..

 

*🔹श्री राजु शंभरकर*
*🔹चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
*🔹मो नं. 9511673435*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : दि.१९ – विठ्ठल मंदिर वार्ड येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण करताना मला मनापासून आनंद होत आहे. या सभागृहात प्रत्येक वयोगट,समाजातील प्रत्येक जाती-धर्म साऱ्यांना एकत्र येऊन सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करता येणार आहे. हे सभागृह खऱ्या अर्थाने सामाजिक ऐक्याचे प्रतिक ठरणार आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

विठ्ठल मंदिर वार्ड येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेविका संगिता खांडेकर, राजेंन्द्र खांडेकर, रमेश भुते, अजय वैरागडे, वैभव योरोजवार, श्रीकांत गर्गेलवार, कपील जवादे, विजय काडे, राजू काटकर, प्रकाश गर्गेलवार, देवराव रागीट आदी उपस्थित होते.

सभागृहाच्या उपयोगितेविषयी बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘गरिबांना आपले कौंटुबिक कार्यक्रम घेता यावेत म्हणून वार्डात एखादे सभागृह असावे, अशी इच्छा संगीता खांडेकर यांनी बोलून दाखविली होती. पण त्यासोबतच विद्यार्थ्यांना विविध परिक्षांच्या संदर्भात, व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भात मार्गदर्शन मिळावे म्हणूनही या सभागृहाचा उपयोग होणार आहे. आपल्या भागातील मुलांना पुढे जायचे असल्यास स्पर्धा परीक्षा उत्तम मार्ग आहे. त्याची तयारी करण्याकरिता हे सभागृह एक चांगला पर्याय ठरणार आहे, असे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. संगीता व राजेंद्र खांडेकर हे दाम्पत्य अतिशय सेवाभावी वृत्तीने कार्य करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

*नागरिकांनी मानले आभार*
ना. श्री. मुनगंटीवार यांनी पालकमंत्री या नात्याने नगरोत्थानमधून या सभागृहासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या पुढाकारामुळे ३८ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला. त्यामुळे सामाजिक सभागृह उभे राहू शकले, याची जाणीव ठेवून उपस्थित नागरिकांनी ना. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले.

*म्हाडामधून गरिबांना घरे*
गरिबांसाठी मी एक नवी योजना आणतो आहे. म्हाडामध्ये गरिबांसाठी दहा हजार घरांचा प्रस्ताव आहे. देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडून मी स्वतः या योजनेसाठी मान्यता घेत असून यातील पहिल्या टप्यामध्ये ३ हजार ८०० घरांची मान्यता मिळेल, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

*गरजू नागरिकांना लाभ मिळावा*
ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘गरिबांना अडीच लाख रुपयांचे अनुदान आणि बांधकाम कामगारांचे दोन लाख रुपये अनुदान, असे एकूण साडेचार लाख रुपयांचे अनुदान देत अतिशय अल्प दरात आपण घरे उपलब्ध करून देण्याचा विचार करतो आहे. पुढील टप्यात उर्वरित घरांची मान्यता मिळणार आहे. संगीताताई आणि राजेंद्र खांडेकर सारख्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी गरजू गरीब नागरिकांना पुढे आणावे आणि याचा लाभ मिळवून द्यावा.’

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.