▪️चामोर्शी ते मूल रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करा..
▪️शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चामोर्शीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : चामोर्शी ते मुल रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असल्याने जनतेची जिवतहानी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चामोर्शीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
चामोश – हरणघाट ते मूल पर्यंत रस्त्याची अवस्था फार बिकट झाली आहे. येणा-या जाणा-या लोकांना व शाळेकरी मुलांना सुध्दा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्यावर जिवीत हानी होत आहे.
चामोशी ते हरणघाट रस्त्याच्या कामाला सुरवात न केल्यास शिवसेना वैद्यकिय कक्षातर्फे आंदोलनाची दखल घेण्यात येईल. असा इशारा देण्यात येत आहे.
संबंधित बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन चामोश ते हरणघाट मुख्य रस्त्याचे काम त्वरीत करण्यात यावे. अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागचे डी.जे.डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुणाल काकडे सि.ई.ए संतोष बहुरे हि.ई.ए.
दीपक सदूलवार संगणक कक्ष यांच्याकडे निवेदनातून केली आहे निवेदन देताना वैद्यकीय मदत कक्ष चामोर्शीचे तालुका प्रमुख यशवंत कत्रोजवार, उपप्रमुख चंद्रभुषण वालदे, तालुका गटप्रमुख सुरज नैताम, गडचिरोली जिल्हा चामोर्शी विधानसभा सचिव संतोष कटारे, विधान सभा शहरं प्रमुख शुभम चलाख, सदस्य अंकुल फुलझले, प्रशिक नंदेश्वर, कार्तिक चौके, विवेक दुधबळे उपस्थित होते.


