▪️शेतकऱ्यांचा व बैलांचा सन्मान राखण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा : संतोषसिंह रावत – सरचिटणीस प्रदेश काँग्रेस कमेटी
▪️आकर्षक बक्षीसाने बाल स्पर्धक भारावले..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मुल – ( इंडिया २४ न्यूज ) : कृषी प्रदान देशात आपल्या संस्कृतीच दर्शन म्हणून शेतकऱ्यांचा राजा अन्नदाता बैल शेतकऱ्यांचा मोठा सण बैल पोळा व दुसऱ्यादिवशी तान्हा पोळा आयोजन करुन लहान मुलांना बैलाच्या रूपात नंदीबैलाची ओळख व्हावी म्हणून तान्हा पोळ्याचे आयोजन करण्याची परंपरा अजूनही जोपासली जात आहे.
२३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता पासून गांधी चौक मुल येथे मां. दुर्गा मंदिर समिती, युवाशक्ती व्यायाम मंडळ, व संतोष सिंह रावत मित्र परीवर तर्फे भव्य तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट नंदी सजावट करिता पाच बक्षिसे, उत्कृष्ट वेशभूषा करिता पाच बक्षिसे तसेच विजेते स्पर्धक वगळून उर्वरित सहभागी स्पर्धकांसाठी लकी ड्रॉ पारितोषिक ठेवण्यात आले होते. यात आकर्षक प्रथम बक्षीस (रूपल रावत) यांचे तर्फे वॉशिंग मशीन जुगेश गोवर्धन मानकरी ठरले, उत्कृष्ट सजावट,प्रथम बक्षीस ( संतोषशिंह रावत ) यांचेकडून प्रियांशु झरकर मानकरी. द्वितीय बक्षीस ( राकेश रत्नावार) कडून मानकरी कान्हा मोहबंशी, मिडीयम सायकल, तृतीय बक्षीस (राजू पा. मारकवार) कडून मानकरी अंश दुधे, सायकल, चौथा रोख बक्षीस १५०० (सुनील शेरकी)कडून स्वर चांभारे यांना, पाचवा बक्षीस रोख १००० रुपये अतुल गोवर्धन यांचेकडून स्मरण डोंगरे यांनी प्राप्त केला. तर उत्कृष्ट वेशभूषा सीन सिनेरी, मध्ये प्रथम बक्षिस (संतोषसिंह रावत) यांचेकडून मानकरी रिया पुपरेड्डीवर हिला रेंजर सायकल, द्वितीय बक्षीस (राजेंद्र कन्नमवार) यांचेकडून विदिशा हेडाऊ, हिला मिडीयम सायकल, तृतीय बक्षीस ( घनश्याम येनुरकर) यांचेकडून सायकल मानकरी वत्सल वाढई ठरले. चौथा बक्षीस( संदीप कारमवार) यांचेकडून अद्वितीय कीर्तीवार यांना १५००/ रोख,पाचवा रोख बक्षीस(विवेक मुत्यलवार) यांचेकडून १०००/ मानकरी अन्याय साखलवार यांना रोख देण्यात आले. मंदिर समितीचे अध्यक्ष प्रदेश काँग्रेसचे महासचिव,बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत व कृ. उ. बा. स. चे सभापती राकेश रत्नावार,उपसभापती राजेंद्र कन्नमवार,विलास कागदेलवार, गुरुदास चौधरी व युवा शक्ती व्यायाम मंडळाचे पदाधिकारी, रूपल रावत,गुलाब पठाण,प्रवीण चेपुरवार,तेजस महाडोळे, दीपक चुगाणी,चतुर मोहुर्ले, चंदु चटारे,सुनील मगर, चेतन नंदाराम, मंदिर समितीचे पदाधिकारी यांचे हस्ते देण्यात आले.
बैल पोळा व तान्हा पोळा हा शेतकऱ्यांचा सण असतो. पण तोच आज संकटात सापडला असून कर्जबाजारी आहे. करिता शासनाने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा. हाच खरा शेतकऱ्याचा सन्मान होईल.असे उद्गार आपल्या मार्गदर्शनातून संतोषसिंह रावत यांनी केले.
सर्व स्पर्धकांना टिफीन बॉक्स देण्यात आले. डिम्पी गोयल यांचेकडून आकर्षक बक्षीस दिले. स्पर्धेचे परीक्षण समिती सचिव संजय पडोळे, शिक्षक संजय घोटेकर,शंकर दडमल,संतोष गावतुरे,प्रतिमा उमक,प्रिया चेपुरवार,सोनाली गदेवार यांनी केले.आयोजकांच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मंचावर विवेक मुत्यलवार,संदीप मोहबे, विष्णू सादमवार, सुरेश फुलझेले, नलिनी आडपवार, रुपाली संतोषवार,लीना फुलझेले, शामला बेलसरे,समता बनसोड,यांचेसह दोन्ही संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. गायक रोशनी वासंवार,सुनील माहोरे व प्रशांत बनसोड यांच्या गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे संचालन सुनील शेरकी यांनी केले आभार गुरु गुरनुले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युवा शक्ती व्यायाम मंडळाचे आणि दुर्गा मंदिर समितीचे सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

