▪️काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता समर्थ यांना अभूतपूर्व जन समर्थन; शहरात उसळली समर्थ लाट..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. 9403179727
मूल – ( इंडिया 24 न्यूज ) : मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या रणधुमाळीत काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. एकता प्रशांत समर्थ यांच्या सभोवती निर्माण झालेलं प्रचंड जनसमर्थन सध्या मूल शहरात चर्चेचा मुख्य विषय ठरलं आहे. विशेष म्हणजे, त्यांचा पती प्रशांत समर्थ यांच्या आक्रमक, वेधक आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क मोहिमेमुळे संपूर्ण शहरात समर्थ दांपत्याची मजबूत लाट दिसून येत आहे.शहरातील असा एकही गल्ली-चौक राहिलेला नाही, जिथे प्रशांत समर्थ यांच्या कार्याची, त्यांच्या शांत पण परिणामकारक नेतृत्वशैलीची आणि एकता समर्थ यांच्या नेतृत्वगुणांची चर्चा होत नाही.“प्रगतशील दृष्टिकोन, शांत स्वभाव आणि कार्यसूत्रीपणा – प्रशांत महासागरासारखे विशाल” असे मतदार स्पष्टपणे व्यक्त करत आहेत.
समर्थ दांपत्याच्या जनविश्वासाने विरोधकांत खळबळ
एकता समर्थ आणि प्रशांत समर्थ यांच्या सभोवती जमा होणारी लोकांची गर्दी, सर्व स्तरांतून उमटणारा पाठिंबा आणि नागरिकांमध्ये दिसणारा उत्साह पाहता विरोधक चांगलेच दबावाखाली आल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. विरोधकांत पराभवाची शक्यता आणि भीती वाढत चालल्याचे परखड संकेत त्यांच्या गोंधळलेल्या हालचालीतून उमटत आहेत.“आता हे थांबवणं अवघड आहे” अशीही चर्चा शहरात खुलेआम रंगते आहे.
शहरात नवा नारा : “एक प्रशांत महासागर… आणि दुसरे प्रशांत समर्थ!”
गेल्या काही दिवसांत समर्थ दांपत्य जिथे जिथे पोहोचत आहे, तिथे तिथे जनतेचा उस्फूर्त कौल दिसत आहे.मोठ्या सभांपासून छोट्या बैठकीपर्यंत, महिलांपासून तरुणांपर्यंत आणि व्यावसायिकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत — समर्थ यांना मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व असल्याचे स्थानिक विश्लेषक म्हणत आहेत.
02 डिसेंबरवर शहराचे डोळे खिळले!
समर्थ दांपत्याला मिळणाऱ्या या प्रचंड लोकसमर्थनाचे परिणाम मतपेटीत कसे उमटतात, याकडे आता संपूर्ण मूल शहराचे लक्ष आहे.“या वेळी लाट समर्थांचीच आहे” असा स्पष्ट जनमताचा सूर उमटू लागला आहे.
काँग्रेसच्या एकता आणि प्रशांत समर्थ दांपत्याला मिळणाऱ्या लोक समर्थनामुळे मूल शहरातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.जनतेचा कौल कोणाच्या दिशेने वाहतो आहे, हे आता दडपून ठेवणे अशक्य झाले आहे. 02 डिसेंबर रोजीचा मतदान दिवस… समर्थ दांपत्याच्या विजयाची लेखी मोहर ठरतो का?संपूर्ण शहर याची उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहे.



