▪️भाडभिडि उपक्षेत्रात व्याघ्रगणना, पगमार्क आढळले..!
▪️नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे वनविभागाचे आवाहन..!

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
भाडभिडि – ( इंडिया 24 न्युज ) : भाडभिडि उपवन क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून वास्तव्यात असल्यामळे शेतकरी व नागरिकांनी शेतीचे कामासाठी किंवा इतर कामासाठी जंगल परिसारात जाताना विशेष काळजी घ्यावी
– आर. बी. इनवते. वनपरिक्षेत्र अधिकारी, चामोर्शी
गडचिरोली – आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या चामोर्शी वनविभागातील भाडभिडि उपक्षेत्रात 27 नोव्हेबरपासुन वनपथकाकडून व्याघ्रगणना करण्यात येत आहे ही व्याघ्रगणना करताना वनविभागाच्या पथकाला भाडभिडी उपक्षेत्रातील भाडभिडी नियतक्षेत्रात वाघाचे पगमार्क आढळून आले असल्याची माहिती भाडभिडी नियतक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक व्ही एस चादेकरयांनी दिली आहे
भाडभिडी उपक्षेत्रातील भाभिडी नियतक्षेत्राता 27 नव्हेबरपासून चमोर्शी वन परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी आर बी इनवते यांच्या मार्गदर्शनात भाडभिडी उपवन क्षेत्राचे क्षेत्र साहाय्यक व्ही एस चांदेकर संतोष ईस्टम भाडभिडीचे उपसरपंच एकनाथ भुरसे विलास भांडेकर रेखेगावचे सोमनकर आदीच्या पथकाने आमगांव महाल भाडभिडी ककापल्ली या नियतक्षेत्रात
व्याघ्रगणना सुरू केली होती त्याच दिवशी जवळपास चारशे मिटर जंगल परिसरात चालत जात असताना नियतक्षेत्र भाडभिडि कक्ष क्रमांक 375 मध्ये वाघाचे पगमार्क आढळून आले होते तर 28 नोव्हेंबर रोजी जंगल परिसरात वाघ वास्तव्यास होता 29 नोव्हेंबर रोजी सांयकाळी कर्कापल्ली येथिल बंडु झुरी या शेतकयाने शेतातिल कापसाच्या पिकातुन वाघ मार्गक्रमण करताना प्रत्यक्ष पाहिले असल्याची माहिती वनविभागाला दिली
यापरिसारात वाघाचे वास्तव्य असल्यामुळे शेतकरी, नागरिक दहशतीत आले आहेत सध्या खरीप हंगामात धानपिक कापणी व बांधणी शेवटच्या टप्प्यात असल्यामूळे शेतकरी जीव धोक्यात घालून येना – जाना करत आहेत गेल्या चार – पाच दिवसांपूरवी कोनसरी वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघाचे वास्तव्य होते त्यानंतर आता वाघाने चामोर्शी वनपरिक्षेत्रात मोर्चा वळविला आहे त्यामुळे नागरिक दहशतीत सापडले आहेत.

