आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️राजुरा विधानसभा मतदारसंघातील पर्यटन विकासासाठी ०२ कोटी रुपयांचा निधी मंजूर!

▪️आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांना यश, पर्यटन विकासाला मिळणार चालना..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : दि. ३० राजुरा विधानसभा मतदारसंघातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ०२ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राजुरा मतदारसंघातील विविध विकासकामांकरीता हा निधी उपलब्ध झाला असून, यामुळे पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२५-२६ अंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून, शासनाने दि. २८ ऑक्टोबर रोजी याबाबतचा शासन निर्णय (GR) काढला आहे. त्यानुसार जिवती तालुक्यातील विष्णूमंदिर परिसराच्या सुशोभीकरण व अनुषंगिक कामांसाठी ५० लक्ष रुपये, कोरपना तालुक्यातील पकडीगुडुम प्रकल्प परिसराच्या सुशोभीकरण व अनुषंगिक कामांसाठी १०० लक्ष रुपये तर गोंडपिपरी तालुक्यातील कन्हारगांव अभयारण्यात अंतर्गत विकास कामांसाठी ५० लक्ष रुपये अशा एकूण ०२ कोटी रुपयांच्या विकासकामांसाठी हा निधी आहे. यापैकी ५० लक्ष रुपयांचा निधी तातडीने वितरित सुद्धा करण्यात आला आहे.

आमदार देवराव भोंगळे यांनी या कामांसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा निधी मंजूर झाला आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याबद्दल मतदारसंघातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. यासोबतच जनतेमध्ये ‘विकासाचा वादा, देवरावदादा’ हे उद्घोष आता अधिक दृढ होत असल्याचे चित्रही मतदारसंघात दिसून येत आहे. या निधीमुळे पर्यटनस्थळे विकसित होऊन स्थानिक रोजगारालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.