आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️भाजपाचे ज्येष्ठ नेते मान. प्रकाशजी सावकार पोरेड्डीवार यांना माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्याकडून निमित्त शुभेच्छा दिल्या..

 

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ

आरमोरी – ( इंडिया 24 न्युज ) : भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आदरणीय श्री. प्रकाशजी सावकार पोरेड्डीवार यांच्या आरमोरी येथील निवासस्थानी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट देऊन त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ. अशोकजी नेते यांनी श्री. प्रकाशजी पोरेड्डीवार यांना उत्तम आरोग्य, निरोगी व दीर्घायुष्य लाभावे तसेच समाजसेवा आणि राष्ट्रसेवेच्या कार्यासाठी त्यांना अखंड ऊर्जा, उत्साह व यश लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

या सदिच्छा भेटीप्रसंगी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, नगरपरिषदेचे नगराध्यक्ष रुपेश पुणेकर, उपनगराध्यक्ष विलास पारधी,नगरसेवक अक्षय हेमके,माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, नंदुभाऊ नाकतोडे,अभिजीत कोरडे, भगवानजी बनसोड तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्नेहपूर्ण वातावरणात झालेल्या या भेटीदरम्यान विविध सामाजिक, संघटनात्मक आणि जनहिताच्या विषयांवरही उपस्थितांमध्ये मनमोकळ्या चर्चा झाल्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.