ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मूल शहरात विकासाची गती रस्ते, नाल्या ई. विविध कामांना वेग – आ. सुधीर मुनगंटीवार

▪️पुढाकारातून मूल शहरास विकासाची नव संजवनी न. प. पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यास यश..

 

*🔸डॉ. आनंदराव कुळे*
*🔸मुल तालुका प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9403179727*

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली मूल नगर परिषद क्षेत्रात विविध विकासकामांना मोठ्या प्रमाणात गती मिळाली असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कामे मंजूर झाली आहे. न. प. मूल च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे.रस्ते व बंदिस्त नाल्यांचे जाळे उभारणे, समाजभवन व मल्टीपरपज हॉलसारखी सुविधा निर्माण करणे, कौशल्यविकास केंद्रांची उभारणी तसेच ओपन स्पेसचे सुशोभीकरण अशा विविध कामांमुळे मूल शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे.
मूल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी मंजूर करून घेण्यासाठी आ.मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आणि त्यामध्ये मूल नगर परिषद क्षेत्रात प्रशांत पेदोजवार ते सरकारी बोडीपर्यंत सी.सी. रोड व बंदिस्त नाली, गिरडकर ते कटरे ते बट्टे यांच्या घरापर्यंत रस्ता, दुर्गा मंदिर परिसरातील नाली बांधकाम, वार्ड क्र. १५ मध्ये विवेक मांदाडे ते रवी समर्थ यांच्या घरापर्यंत रस्ता व नाली, तसेच एचडीएफसी बँक ते किशोर वेल्लावार यांच्या घरापर्यंत सी.सी. रोड व नालीची कामे सुरू आहेत. याशिवाय दिलीप रामटेके ते प्रमोद रामटेके, विवेक मुत्यालवार यांच्या घराजवळील रस्ते, तसेच रेस्ट हाऊस रोड ते प्रगती कॉम्प्युटर ते गोवर्धन यांच्या घरापर्यंत रस्त्यांचे बांधकाम करण्यात येत आहे.
शहरातील वार्ड क्र. ७ मध्ये कृष्णा गेडाम ते नामदेव डंकेवार यांचे घरापर्यंत रस्ता व नाली, इंदिरा नगर (वार्ड क्र. ८) मध्ये नागोसे वकील ते रमेश माहूरपवार यांचे घरापर्यंत रस्ता, तसेच विविध भागांतील कामे हाती घेण्यात आली आहेत. पोस्ट ऑफिसजवळील महात्मा जोतीबा फुले चौकात स्टील रेलिंगचे बांधकामही करण्यात येत आहे.सामाजिक व सांस्कृतिक सुविधांच्या दृष्टीने वार्ड क्र. ३ मधील मोठा माळी मोहल्ल्यात समाजभवन उभारले जात असून संत जगनाडे महाराज सामाजिक सभागृहाचे बांधकामही प्रस्तावित आहे. मोजा मूल येथे मल्टीपरपज हॉल (इनडोअर गेम व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी) उभारण्यात येत आहे. तसेच अंगणवाडी बांधकाम व विविध प्रभागांमध्ये ओपन स्पेस विकसित करण्याची कामेही प्रगतीपथावर आहेत.
धार्मिक व सामाजिक स्थळांच्या सुशोभीकरणालाही प्राधान्य देण्यात आले असून बौद्ध विहार परिसरात संरक्षक भिंती व सौंदर्यीकरणाची कामे करण्यात येत आहेत. माता मंदिर ते राष्ट्रीय महामार्गपर्यंत सी.सी. नाली बांधकाम, तसेच शहरातील इतर भागांतील रस्ते व नाल्यांचे कामही सुरू आहे.पर्यावरण व स्वच्छतेच्या दृष्टीने मटन मार्केटमध्ये ईटीपी प्लांट उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय नगर परिषद क्षेत्रात साई बाबा मंदिर, गणेश मंदिर परिसर तसेच हनुमान मंदिराजवळ कौशल्यविकास केंद्रांची उभारणी करून युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
या सर्व विकासकामांच्या माध्यमातून मूल शहरात पायाभूत सुविधांची भक्कम उभारणी होत असून, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि इतर मूलभूत सेवांमध्ये झालेली ही लक्षणीय सुधारणा शहराच्या सर्वांगीण प्रगतीची साक्ष देत आहे. या परिवर्तनामागे सातत्याने विकासाचा ध्यास घेत काम करणारे आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे नेतृत्व ठळकपणे अधोरेखित होते. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे आणि न. प. मूल च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे मूल शहर विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत असून, मुलवासीय नागरीकांकडून आ.मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.