▪️आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सुशी ( दाबगाव ) येथे केले हनुमान मंदिर सभागृह बांधकामाचे भूमिपूजन..
▪️सभागृह बांधकामासाठी आमदार निधीतून २५ लाख रुपयांची घोषणा..

*🔸डॉ. आनंदराव कुळे*
*🔸मुल तालुका प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9403179727*
मूल – ( इंडिया २४न्यूज ) :आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुल तालुक्यातील मौजा सुशी दाबगाव येथे सभागृह बांधकामाचे भूमिपूजन केले. हनुमान मंदिर सभागृहाच्या उभारणीसाठी आमदार निधीतून २५ लाख रुपयांची घोषणा आ.मुनगंटीवार यांनी केली.जीर्ण अवस्थेतील मंदिराच्या नव्या उभारणीची ग्रामस्थांची दीर्घकालीन इच्छा आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले. तसेच हनुमान मंदिर सभागृहाचे बांधकाम पुढील हनुमान जयंतीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.
सुशी गावाच्या विकासासाठी आतापर्यंत २.५२ कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. उर्वरीत विकासकामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.यावेळी भाजपा नेते प्रकाश देवतळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



