आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली जिल्हा चंद्रपूरच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सौ उज्वला सोयाम भेट घेऊन शाल श्रीफळ देऊन सन्मानित..!

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली जिल्हा चंद्रपूरच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सौ उज्वला सोयाम यांना राष्ट्रीय फ्लारेन्स नाइटिंगेल या राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले त्यामुळे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली जिल्हा चंद्रपूरच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या कार्याची सेवेची माहिती घेतली आणि भविष्यात त्यांच्याकडून चांगले सेवेची अपेक्षा व्यक्त करून त्यांचा संघटनेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ आणि संविधान देऊन जिल्हाध्यक्ष श्री जनार्धन गेडाम, शहर जिल्हाध्यक्ष सौ बेबीताई उईके यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी, नगरसेविकाआणि जिल्हा उपाध्यक्ष सौं सरला कुलसंगे ,प्रदेश सहसचिव श्री भैय्याजी उईके जिल्हा कार्याध्यक्ष श्री आनंद तिराणकर, जिल्हा महासचिव (मु ) श्री अरविंद परचाके, चंद्रपूर शहर अध्यक्ष श्री किशोर शेडमाके, महिला शहर सचिव सौं वैशाली चांदेकर,शहर शहसचिव श्री नीलकंठ येरमे,जेष्ठ कार्यकर्त्यां सौं कुसुमताई आळे, शाखा अध्यक्ष श्री प्रकाश मेश्राम, सचिव श्री जोगी नैताम, जेष्ठ कार्यकर्त्यां सौं मीना गेडाम, सौं सुशीला नैताम, सौं अल्का उईके या सह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सौं उज्वला सोयाम यांना पुढील वाटचालीस भरभरून संघटनेच्या वतीने शुभेच्छा दिल्या आणि अशीच प्रगती व्हावी अशी अशा व्यक्त करण्यात आली

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.