आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️बचतीतून स्वावलंबन, तर पीक कर्जातून शेतकऱ्यांच्या स्वप्नांना नवी उभारी !

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने शाखा लोंढोली येथे महिला बचत गट व पीक कर्ज वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा साथ फाउंडेशनचे अध्यक्ष *मा. श्री. रोहितभाऊ बोम्मावार* उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध महिला बचत गटांना एकूण रु. 13,00,000/- चे कर्ज वाटप करण्यात आले. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळाली असून त्यांच्या छोट्या व्यवसायांना व आर्थिक प्रगतीला चालना मिळणार आहे.

तसेच खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर विविध सेवा सहकारी संस्थांमार्फत शेतकरी बांधवांना एकूण रु. 3,31,24,500/- चे पीक कर्ज वितरित करण्यात आले. वेळेवर आर्थिक सहाय्य मिळाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना मा. रोहितभाऊ बोम्मावार यांनी महिला बचत गट हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मजबूत आधारस्तंभ असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे ही बँकेची प्राथमिकता असून शेती व ग्रामीण विकासासाठी अशा योजनांचा मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास मा. ओमदेव पा. मंगर (माजी उपाध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), दादाजी पा. किनेकार, ईश्वर पा. चरडुके, देवराव पा. मुद्दमवार, मनोहर पा. कुकडे, वैशालीताई कुकडे, राकेश पा. गड्डमवार, छगन पा. मुद्दमवार, राजेंद्र देशमुख, मनोज खोबे तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.