▪️मूल तालूका प्रशासना तर्फे “हर घर तिरंगा” उपक्रमांतर्गत तिरंगा रॅली..
▪️प्रशासनातील अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ): “हर घर तिरंगा” या मोहिमे अंतर्गत लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबदल वैयक्तीक बंध निर्माण करण्याच्या दृष्टिकोणातुन ‘हर घर तिरंगा’ राबवीण्यात येत आहे. या अभियानाचे तीन टप्पे असून २ऑगस्ट २०२५ ते ८ ऑगस्ट २०२५ पहिला टप्पा, ९ ऑगस्ट २०२५ ते १२ ऑगस्ट २०२५ दुसरा टप्पा, दि.१३ ऑगस्ट २०२५ ते दि.१५ ऑगस्ट २०२५ तिसरा टप्पा, अशा तीन टप्प्यामध्ये विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात येत आहे.
तिरंगा हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे प्रतीक असून भारताच्या ऐक्य व विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारा आहे. नागरिकांमध्ये राष्ट्राभिमान, देशभक्ती आणि राष्ट्रीय ध्वजाविषयी आदर निर्माण करण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे.
त्याचा एक भाग म्हणुन तहसील कार्यालय मूल व पंचायत समिती मूल च्या वतीने दि.१३.०८.२०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता तहसील कार्यालयापासून ते चंद्रपूर – नागपूर रोड परत नगरपरिषद मूल पासून गांधी चौकात तिरंगा रॅलीचे आगमन झाले.गांधी चौकात नायब तहसीलदार पवार,पंडीले,चिडे यांनी गांधीजींच्या पुतळयाला पुूष्पार्पन करून न्याय दंडपालीका कोर्ट समोरील देशभक्त प्रतिमे जवळ थांबून नारे लावून त्यानंतर पंचायत समिती मूल,तहसील कार्यालय मूल पर्यंत तिरंगा रॅली आयोजीत करण्यात आली .या तिरंगा रॅलीत तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.