▪️संविधान रक्षणासाठी मत चोरीची चौकशी करण्यासाठी मूल तालुका काँग्रेसच्या वतीने निवडणूक आयोगाला निवेदन

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : लोकसभेचे विरोधी पक्षनेते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते,जनतेचा आधार खासदार मा. राहुलजी गांधी यांनी नुकतेच बेंगलुरु येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय स्तरावरील प्रसार माध्यमांसमोर विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतांची चोरी याबाबत सबळ पुराव्यासह निवडणूक आयोगाचा जाब विचारून आयोगानेचं उत्तर द्यावे अशी मागणी केली असता याचे उत्तर मात्र निवडणूक आयोग देत नसून सत्ताधारी पक्षाचे नेतेच उत्तर देत आहेत. याचा अर्थ निवडणूक आयोग गप्प का !!?? असा आरोप राहुलजी गांधींनी केला. मतदान हा संविधानानुसार नागरिकांचा हक्क आहे. यासाठी संविधानाचे रक्षण करण्यासाठी झालेल्या मत चोरीची चौकशी करुन चोरीची सत्यता जाणून घेण्यासाठी व खासदार राहुलजी गांधी यांना साथ देण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे महासचिव,माजी जी.प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांचे मार्गदर्शनाखाली मूल तालुका काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या केंद्र निहाय मतदार यादी, झालेल्या मतदानाची माहिती व सी.सी.टी.व्हि.फुटेज बाबतची माहिती देण्यात यावी, असे निवेदन मान. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मा. उपविभागीय अधिकारी मूल यांचे मार्फतीने मूल काँग्रेस पदाधिकारी यांनी दिले.
सत्यतेसाठी मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देताना सभापती राकेश रत्नावार, जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, युवक अध्यक्ष पवन निलंमवार, संचालक किशोर घडसे,माजी जी.प. सदस्या मंगला आत्राम, संचालिका चंदा कांमडी, नत्थु पाटील आरेकर,संचालक विवेक मुत्यलवार, ओबीसी प्रदेश सरचिटणीस गुरुदास चौधरी,ज्येष्ठ नेते बंडू गुरनुले, सरचिटणीस कैलास चलाख, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, माजी नगर सेविका लीना फुलझेले, शहर अध्यक्षा नलिनी आडपवार,सचिव शामला बेलसरे, उपाध्यक्ष संदीप मोहबे, समता बनसोड,अतुल गोवर्धन,आकाश वाकुडकर, फर्जना शेख, दत्तु समर्थ, ओबीसी प्रदेश सचिव राजेंद्र वाढई, विनोद कांमडी, सुरेशव फुलझेले, आकाश दहिवले,प्रशांत उराडे,डेव्हिड खोब्रागडे, विकास गेडाम, पंकज आसमवर, सीमा भासारकर, वैशाली घुगरे, दुशीला गेडाम, भूमिका मडावी, मंगला कुलसंगे, आदी तालुका व शहर काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.