▪️उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांनी केले ध्वजारोहण..
▪️आजचे आकर्षणाचे केंद्र ठरली ५००फूट लांबीच्या तिरंग्यासह तिरंगा रॅली..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे ७९व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्सव उत्साहात पार पडला.
सर्वप्रथम मूल पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय राठोड यांनी पोलीस स्टेशनमध्ये ध्वजारोहण केले. त्यांनतर नगर परिषदेच्या प्रांगणात मा.श्री अजय चरडे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी,मूल यांचे हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
कृषी महाविद्यालय येथे सहयोगी अधिष्ठाता डॉ.अतकरे यांनी ध्वजारोहण केल्यानंतर कृषी महाविद्यालय मूल ते स्वामी विवेकानंद विद्यालय पहिली तिरंगा रॅली काढण्यात आली.येथे माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी ध्वजारोहण केल्यानंतर स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दुसरा मोठा तिरंगा घेऊन रॅली काढली.या दोन्ही रॅली गूजरी चौकात आल्या. गुजरी चौकात नगरअभियंता भगत यांनी ध्वजारोहण केले.
गुजरी चौकातून या दोन्ही रॅलींचा संगम करीत ती रॅली सोमनाथ रोड,गांधी चौक ते तहसील कार्यालय मूल पर्यंत ५०० फुट लांबीचा तिरंगा घेवून तिरंग्यासह पोचली.
मार्गात अनेक संस्थांच्या वतीने खाऊ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्यानंतर सकाळी ९वाजून ५मिनिटांनी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांनी ध्वजारोहण केले.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्री.चरडे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या व चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
याशिवाय स्वायत्त संस्थेतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तहसील कार्यालयात ध्वजारोहण प्रसंगी उपविभागीय अधिकारी अजय चरडे , तहसिलदार मृदुला मोरे,नायब तहसीलदार विजय पंडीले, दिनेश पवार, प्रविण चिडे, रामचंद्र नैताम ,निरीक्षण अधिकारी राजेश शिरभाते , वेगवेगळ्या कार्यालयातील अधिकारी, मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय राठोड, जागृत ग्राहक राजा या सामाजिक संघटनेच्या वतीने दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत, अशोक मैदमवार उपाध्यक्ष मूल तालुका,रमेश डांगरे सचिव , कार्यकारिणी सदस्य डॉ आनंदराव कुळे, दिलीप कटलावार, प्रमोद मशाखेत्री,रजनी झाडे , यांच्यासह माजी स्वातंत्र्य सैनिक, निवृत्त कर्मचारी ,उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी, तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक,विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच राजकीय नेतेमंडळी,विविध संघटनांचे पदाधिकारी,पत्रकार, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.