आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर शहरात अष्टभूजा वार्डातील युवकाचा खून ४ आरोपींना केला अटक..

▪️४ आरोपींना रामनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने ०२ तासाचे आत ठोकल्या बिड्या..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूर शहरात दि. ०४/०८/२०२५ रोजी चे रात्री ०३.०० वा.चे सुमारास रामनगर पोलीस स्टेशन माहिती प्राप्त झाली की, आष्टभूजा वार्ड, चंद्रपूर येथील छोटू उर्फ मृणाल प्रकाश हेडाऊ, वय- ३५ वर्षे याचा मारहाण करून कोणीतरी खून केला आहे.

त्याबाबत पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्र. ६२१/२०२५ कलम १०३(१), ३३३, ३(५) बी.एन.एस. नुसार गुन्हा दाखल केला. रामनगर पोलीस स्टेशनचे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन गोपनीय तपास करून सदर मयतास मारहाण करणारे आरोपी ▪️सुमोहित उर्फ गोलू चंद्रशेखर मेश्राम, वय- २६ वर्षे, ▪️ टिल्लू उर्फ अनिल रामाजी निकोडे, वय- ३० वर्षे, ▪️ सुलतान अली साबीर अली, वय ३० वर्षे, ▪️ बबलू मुनीर सय्यद, वय- ३८ वर्षे, सर्व रा. अष्टभूजा वार्ड, चंद्रपूर हे असल्याची गोपनीय माहिती काढून लागलीच त्यांचा शोध घेऊन ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि प्रशांत लभाने, पो.स्टे. रामनगर हे करीत असून आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता त्यांची ०३ दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे.

वरील कारवाई ही पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. व रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, पो.नि. अमोल काचोरे, सहा. पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, स.पो.नि प्रशांत लभाने, स.पो.नि. शिवाजी नागवे, स.पो.नि. दिपक कांक्रेडवार, पो.उ.नि. विनोद भुरले, पो.उ.नि. हिराजंद गव्हारे, पो.उ.नि. अतुल राठोड पोलीस अंमलदार गजानन नागरे, जितेंद्र आकरे, लालू यादव, शरद कुडे, आनंद खरात, विनोद यादव, बाबा नैताम, मनिषा मोरे, रजनीकांत पुठ्ठठावार, इंदल राठोड, संदिप कामडी, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, रविकुमार ढेंगळे, हिरा गुप्ता, संदेश सोनारकर, प्रशांत झाडे, सुरेश कोरवार, रूपेश घोरपडे व ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.