▪️शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, चंद्रपूर येथे “न्यायिक सेवा परिक्षांकरिता मार्गदर्शन” याविषयावर कार्यक्रम संपन्न..

*🔸श्री. कुणाल गरगेलवार*
*🔸चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9356776439*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : सर्वोदय शिक्षण मंडळाच्या शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाच्या करिअर मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सेलने न्यायाधिश इच्छुकांसाठी एक व्यापक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात कायद्याच्या अंतिम वर्षाच्या पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा, विशेषतः न्यायव्यवस्थेची तयारी करणा-या विद्याध्यर्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला.
या कार्यक्रमाचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे नुकतेच नियुक्त झालेल्या न्यायाधीशांची वक्ते म्हणून उपस्थिती होती. परीक्षा प्रक्रियेत यशस्वीरित्या मार्गक्रमण करण्याच्या त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवामुळे सहभागीना अमूल्य माहितो मिळालो. या न्यायिक कामगिरी करणाऱ्यांनी न्यायालयीन परीक्षांची तयारी करताना जोपासले जाणारे गुण, लक्षात घेण्याजोगे बारकावे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. एजाज शेख, प्रमुख पाहुण्या अॅड. स्नेहा मेश्राम, अॅड. योजना बावरे, करिअर मार्गदर्शन कक्षाचे प्रमुख डॉ. अभय बुटलं, संशोधन केंद्र व पदव्युत्तर विभागाचे प्रमुख डॉ. पंकज काकडे व पाच वर्षिय अभ्यासक्रमाचे विभाग प्रमुख डॉ. मनोषा आवळे यांचे स्वागत करून कार्यक्रमाचो सुरुवात उत्तीर्ण न्यायाधीशांच्या सत्काराने झाली. पुढील पिढीच्या विद्याथ्यर्थ्यांना मार्गदर्शन करून महाविद्यालयाच्या प्राचार्यामार्फत स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शकांची प्रेरक भाषणे, करिअर रोडमॅप आणि प्रश्नोत्तरी स्वरूपात मार्गदर्शन सत्रांची मालिका झाली. जो विशेषतः न्यायिक सेवा परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या आव्हानांना आणि धोरणांना तोंड देण्यासाठी आवश्यक आहे, त्याचे यथायोग्य असे मार्गदर्शन करण्यात आले.
प्लेसमेंट सेल समन्वयक प्रा. नंदिता व्ही. नायर यांनो कार्यक्रमाचे संचालन केले आणि मान्यवरांचे आभार मानले. तसेच प्लेसमेंट सेल हे विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता नेहमी तत्पर राहिल असे वचन देण्यात आले.
विद्यार्थ्यांनो या कार्यक्रमाचे कौतुक अतिशय प्रेरणादायक कार्यक्रम म्हणून केले, ज्यामुळे अनेकांना न्यायाधीश होण्याच्या तयारीच्या मार्गाबद्दल स्पष्टता मिळाली.