▪️”एक हात मदतीचा” या उपक्रमाअंतर्गत चिमुकल्यांना मिळाले शैक्षणिक साहित्य सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांचा पुढाकार..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात “एक हात मदतीचा” या उपक्रमांतर्गत सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागात अतिशय कौतुकास्पद कामे केले आहेत. या उपक्रमा अंतर्गत नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवणे तसेच आभा कार्ड, पॅन कार्डचे मोफत वाटप, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, रोजगार मार्गदर्शन केंद्र, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण चालवणे असे विविध सामाजिक उपक्रम मागील अनेक वर्षापासून केले जातात. या उपक्रमामुळे हजारो युवक युवती नागरिकांना फायदा मिळाला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून पेटतडा येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे (नोडबुक) वाटप करण्यात आले. यावेळेस गावातील नागरिकांना सुद्धा मार्गदर्शन करत आपल्याला कोणतीही अडचण असेल तर मला हक्काने फोन करा एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत आपली समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असे हे तनुश्रीताई आत्राम यांनी ग्रामस्थांना आश्वासित केले. या कार्यक्रमाला शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक के.के.सोनटक्के,पी.डब्ल्यू.किरमे, आर एस वरभे,एन एम कन्नाके, यांच्यासह प्रशांत गेडाम, प्रवीण गेडाम, रमेश कन्नाके,ओमप्रकाश बल्लारवार,सोनिका ताई तुकलवार,करीना ताई कोल्हेवार,शोभाताई कन्नाके, सावित्रीबाई पेंदाम, संजय नागुलवार वनिता कोसरे आदी मान्यवर व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.