आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

◼️ सचिनच्या आगमनाने कच्चेपार सफारी गेटला नवी ओळख

 

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही: (इंडिया२४ न्यूज)
ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कच्चेपार सफारी गेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी येथील जंगल सफारी केल्याने पर्यटकांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले.

सचिन तेंडुलकर यांनी कच्चेपार गेटमधून सफारी करत जंगलाच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेतला. जंगलाच्या मध्यभागी असलेली सिंदबोडी तलाव ही जागा विशेष आकर्षण ठरत असून, येथे पर्यटकांना एक वेगळाच अनुभव मिळतो. उभाट जंगल रचना, शांत वातावरण आणि हिरवाईने नटलेला परिसर पाहून ते भारावून गेले.

त्यांच्या सफारी दरम्यान वाघाचे दर्शन झाले की नाही याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या परिसराने प्रभावित होऊन पुन्हा एकदा येथे भेट देण्याचे आश्वासन दिले आहे.

सचिन तेंडुलकर यांच्या या भेटीमुळे कच्चेपार सफारी गेटला नवी ओळख मिळत असून, पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.