▪️केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विषयक योजनांसाठी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी करून घ्यावी : मृदुला मोरे तहसीलदार, मूल

*🔸डॉ. आनंदराव कुळे*
*🔸मुल तालुका प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9403179727*
मुल – ( इंडिया २४ न्यूज ) : मुल तालुक्यातील समस्त शेतकरी व जनतेस कळविण्यात येते की, माहे जुन २०२५पासुन पावसाळा हा मानसुन कालावधी सुरु झालेला आहे. या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमध्ये अवेळी पाडुस, अतिवृष्टी व वादळ वारा पुरपरिस्थीतीमुळे शेतपिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये भविष्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास शेतपिक नुकसान अनुदानाकरीता अॅग्रिस्टक योजनेअतंर्गत सर्व शेतकरी यांचे फार्मर आयडी/शेतकरी ओळख क्रमांक असणे आवश्यक आहे. शेतकरी यांचे फार्मर आयडी/शेतकरी ओळख क्रमांक तयार केले नसल्यास शेतकऱ्यांना शेतपिक नुकसान अनुदानचा लाभ मिळणार नाही.
करीता मुल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधील मौजा या गावातील सर्व शेतक-याना आव्हान करण्यात यावे की, शासनाच्या विविध राबविण्यात येणा-या योजनाच्या लाभाकरीता शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आलेले असल्याने संबधित गावातील शेतक-यांचा व त्याच्या शेतांचा आधार संलग्न तयार करण्याकरीता प्रत्येक शेतकरी यांनी आपल्या ७/१२ ला आधार लिंक करुन घेणे आवश्यक आहे. असे सर्व ग्राम पंचायत स्तरावरून शेतकऱ्यांना कळविण्यात यावे. असे आव्हान मुल तहसीलदार मृदुला मोरे यांनी एका जाहीरनाम्याद्वारे केले आहे.
आकस्मिक अतिवृष्टी व पुरपरिस्थीतीमुळे नुकसान झालेल्या शेतपिक अनुदानाकरीता शेतकरी फार्मर आयडी/शेतकरी ओळख क्रमांक शेतकऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेले आहे. करीता सर्व शेतकरी यांनी आपल्या गावातील नागरी सुविधा केंद्र (CSC) येथुन ७/१२ला आधार लिंक नोदंणी करुन शेतकरी फार्मर आयडी/शेतकरी ओळख क्रमांक तयार करणे आवश्यक असल्याबाबत वेळोवेळी सुचित करण्यात आलेले आहे.
परंतु अदयापही ज्या शेतक-यानी अॅग्रिस्टक फार्मर आयडी/शेतकरी ओळख क्रमांक नोदंणी केलेली नाही त्या शेतक-यांनी तात्काळ अॅग्रिस्टक नोंदणी करुन घ्यावी. जर का ओळख क्रमांक नोंदणी केली नाही तर भविष्यात शेतकऱ्यांना शेतपिक नुकसान अनुदानपासुन वचिंत रहावे लागेल. व शेतपिक नूकसान अनुदान न मिळाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही शेतकऱ्यांची राहील. त्याकरीता तहसील कार्यालय जबाबदार राहणार नाही. याची तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. असे आव्हान तहसीलदार मृदुला मोरे यांनी केले आहे.