▪️विष प्राशन केलेल्या युवकाच्या उपचार साठी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे सरसावले..
▪️तातडीने रुग्णवाहिकेची केली व्यवस्था..!

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
आष्टी – ( इंडिया 24 न्युज ) : कोनसरीजवळील सोमनपल्ली येथील सूरज कोरसे या यचवकाने विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना माहित होताच शिवसेना जिला प्रमुख राकेश बेलसरे यांनी तातडीने धाव घेत रुग्णवाहीका उपलब्ध करुन दिली
सुरज कोरसे यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला मात्र परिस्थिति गंभीर असल्याचे त्याला पुढील वैधकिय उपचार साठी गडचिरोली जिला रुग्णालय हलविने आवश्यक होते
दरम्यान, योग्य वेळी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने कुटुंबियांची मोठी धावपळ सुरू झाली हि माहिती मिळताय शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे हे तातडीने आष्टी ग्रामीण रुग्णालयात पोहोचले
घटनेची गंभीरता ओळखून राकेश बेलसरे यांनी त्वारिंत रुग्णावाहिकाची व्यवस्था करुन सुरज कोसरे याला गडचिरोली येथे हलविण्यासाठि मदत केली त्यांच्या हस्तक्षेपमुळे उपचारासाठी आवश्यक वेळ न दवडता युवकाला पुढील वैधकिय सुविधा मिळू शकत्या यावेळी राजू एडलावार, गीताताई कुद्रपवार उपस्थित होते बेलसरे यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे.



