▪️मुल नगरपरिषद निवडणूक २०२५ : शिवसेना (उ. बा. ठा.) च्या युवा लोकाभिमुख रणरागिणी सौं. टीना राजेश ठाकरे प्रभाग ०८च्या मैदानात..

▪️मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मुल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल नगरपरिषद निवडणूकीत प्रभाग क्र. ०८ मधून शिवसेना (उ. बा. ठा.) ने युवा सौं. टीना राजेश ठाकरे यांची उमेदवारी जाहीर करताच प्रभाग ०८ मधील मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या उमेदवारीला प्रभागातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
उच्चविद्याविभूषित, शांत, प्रेमळ स्वभावाच्या सौं. टीना ठाकरे यांचे पती हे मूल तालुका शिवसेना (उ. बा. ठा.) चे तालुका प्रमुख असून त्यांनी सामाजिक क्षेत्रात अनेक सामाजिक कार्य करून ठसा उमटवला आहे. त्यांनी मूल शहरातील तसेच ग्रामीण भागातील आरोग्य,शिक्षण, स्वच्छता यावर भर देऊन अनेक लोकोपयोगी सामाजिक कार्य केलेले आहे. सौं. टीना ठाकरे यासुध्दा सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.त्यांचे महिला सबलीकरण, महिलांचे स्वावलंबन यावर कार्य चालू आहे. ज्येष्ठ, निराधार, विधवा महिला तसेच कुमारिका यांच्या समस्या जाणून त्या सोडवीण्याचे सतत प्रयत्न करीत असतात. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि स्वावलंबनाचे कार्य अविरत चालू आहे.
मूल शहराचा सर्वांगीन विकास, स्वच्छ प्रशासन आणि लोकाभिमुख कारभार हेच ध्येय समोर ठेऊन निवडणूक लढवीत असल्याचे त्यांनी मत मांडले. प्रभागातील जनतेची निरंतर सेवा हिच माझी प्राथमिकता असेल अशाही त्या म्हणाल्या.शिवसेनेच्या (उ. बा. ठा.) चे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेशी समन्वय साधून समर्थकांसमवेत त्यांनी प्रभागात घरोघरी जाऊन भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवीण्याबाबत आश्वासित करीत आहेत.
सोबतच आगामी काळातही प्रभागातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सदैव कठीबद्ध असेन अश्याही त्या म्हणाल्या. प्रभागातील आवासून उभ्या असलेल्या समस्या सोडवीण्याची त्यांच्यातील तळमळ, सदैव उपलब्ध असणारी सामाजिक कार्यकर्ती म्हणून त्यांना प्रभागातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.



