▪️24 जुलै रोजी शेतकरी कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलनास.. सम्राट अशोक सेनेचा जाहीर पाठिंबा..

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभुळकर
अकोला – ( इंडिया 24 न्युज ) : 24 जुलै रोजी शेतकरी कर्जमाफी व अन्य मागण्यांसाठी होत असलेल्या चक्का जाम आंदोलनास सम्राट अशोक सेनेचा जाहीर पाठिंबा..
पहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्याकडून महाराष्ट्रातील शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला, गरीब व वंचित घटकांच्या मूलभूत मागण्यांसाठी जे आंदोलन सुरू केले आहे. त्यास मी पुर्णपणे जाहिर पाठिबा करतो स्वत या आंदोलनात सहभाग होत आहोत, शेतकरी कर्जमाफी दिव्यांग व विधवांना मासिक रु. 6000/- अनुदान शेतमालाला किमान आधारभूत किंमतीच्या पलीकडे 20% प्रोत्साहन रक्कम (एमएसपी+20), रोजगार, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मुलभूत मुद्यावर जन आंदोलने अपरिहार्य झाली आहेत.
आपण सुरू करत असलेले हे आंदोलन म्हणजे लोकशाही मार्गाने जनतेच्या व्यथा सरकारपर्यंत पोचण्याचा संघर्ष आहे. शांततेच्या मार्गाने चक्का जाम आंदोलनाला मी जाहिर पाठिंबा देत आहे.
आमचा बाप शेतकरी आत्महत्या करत आहेत. कधी करता कर्जमाफी.? शेतकरी मेल्यानंतर गर्दी करून काही अर्थ नाही. जिवंतपणीच गर्दी करून शेतकऱ्यांना कर्जमाफी,मालाला भाव शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे.आत्महत्या केल्यानंतर नाही जिवंतपणी गर्दी करा. शेतकऱ्यांच्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन चक्काजाम करा रस्त्यावर उतरा आपला बाप आत्महत्या करता कामा नाही याची दखल महाराष्ट्र ने घेतली पाहिजे. हेच आवाहन.केंद्र व राज्य सरकारने याकडे तातडीने गांभीर्याने लक्ष द्यावे,अशी आम्ही मागणी करतो. सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य : आकाश दादा शिरसाट