आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️भाजपा तालुकाध्यक्ष पदी किशोर वाकुडकर यांची निवड..

▪️ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला नेतृत्वाची संधी..

 

*🔸श्री. कुणाल गरगेलवार*
*🔸चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9356776439*

सावली – ( इंडिया 24 न्युज : भारतीय जनता पार्टी च्या नुकत्याच मुंबई येथे झालेल्या बैठकीत,पक्षाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण अंतर्गत कार्यरत मंडळासाठी , नवीन मंडळ अध्यक्षांची निवड करण्यात आली,भाजपा चे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी नवीन मंडळ अध्यक्षांची यादी जाहीर केली,यात सावली तालुका भाजपा या अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते किशोर वाकुडकर यांची निवड करण्यात आली.
सावली तालुक्यात उपरी येथील भाजपा चे कार्यकर्ते आणि ‘माझी लाडकी बहिण ‘योजनचे समिती सदस्य असलेले किशोर वाकुडकर हे ग्रामीण भागातील सामान्य कार्यकर्ता,कोणाचाही मदतीला धावून जाणे, पक्षाच्या मिटींग मध्ये येणे,पक्षाने दिलेली कामे , ग्रामीण जनतेला समजून सांगणे आदी काम अगदी प्रामाणिकपणे किशोर वाकुडकर करीत असतात.
आपल्या कार्यामुळे समाजात प्रेरणादायी ठरतात, प्रामाणिकपणा, पारदर्शकता, आणि सेवा या मुल्यावर हा काम करणारा कार्यकर्ता,तर समाजातील गरजू, वंचित, शेतकरी, कामगार यांच्या सेवेसाठी तत्परतेने धावणारा अशी ओळख असणारा सामान्य कार्यकर्ता आज सावली तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्ष पदी पोहचला ,ही आहे त्याच्या कार्याची पावती.
भाजपा कार्यकर्ता आणि लाडकी बहिण योजना समिती सदस्य म्हणून कार्य करतानांच त्यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार यांसारख्या मुलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करून अनेक योजनाची अमंलबजावणी केली,अशा या कार्यकर्त्यांचे तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संतोष सावकर तंगडपलिवार ,सतीश बोम्मावार,राकेश गोलेपलिवार,अर्जुन भोयर, देवराव पाटिल मुदेमवार ,कवींद्र रोहनकर,मनोहर कुकडे, वै शाली कुकडे, भालचंद्र बोदलकर, होमदेव पाटिल मंगर,प्रकाश गड्डमवार,दौ लत भोपये,देवीदास बांनंबले,योगिता डबले,धनराज डबले,मनीषा चिमुरकर,नितिन करड़े, जितेश सोनटक्के आदि पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ता कडून अभिनंदन केले जात असून पुढील कार्याच्या शुभेच्या दिल्या जात आहेत …….

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.