▪️अरबिंदो कोल माईंस कंपनीकडून सामाजिक कार्यकर्ता श्री मनोज दादा ठेंगणे (मा.सैनिक) यांच्या मागण्याची..
▪️सकारात्मक बैठक पार पडली..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक 3 जून 2025 ला अरबिंदो कोल माईंस कंपनीचे नुकतेच नवीन आलेले प्रोजेक्ट हेड श्री. व्यंकट रेड्डी यांच्याशी सामाजिक कार्यकर्ता श्री मनोज दादा ठेंगणे (मा.सैनिक), श्री अमन भाऊ आंदेवार (मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष), श्री किरण भाऊ ठाकरे (महानगर बजरंग दल अध्यक्ष) यांच्याशी सकारात्मक बैठक पार पडली…. या बैठकीत श्री मनोज दादा ठेंगणे यांनी अन्नत्याग आंदोलनामध्ये ठेवलेल्या काही मुद्द्यावर दोन दिवसात विचार करून सकारात्मक निर्णय घेऊ असे श्री व्यंकट रेड्डी यांनी सांगितले त्यात बैठकीमध्ये नुकतेच कंपनीने अवैधरित्या तोडलेले स्थानिक गावाचे आराध्य दैवत भंगाराम मंदिर याची पूर्वीप्रमाणे बांधकाम, तसेच श्री मनोज ठेंगणे यांचे 2026 पर्यंत झालेले सिक्युरिटी गार्डचे करारा नुसार होता काम सुरू ठेवणे तसेच प्रकल्पग्रस्त प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे मोफत RO Water लावण्यात यावे या विषयावर चर्चा झाली आणि या मागण्या लवकर दोन दिवसात निर्णय लावून पूर्ण करून देऊ असेही नवीन प्रोजेक्ट हेड श्री वेंकट रेड्डी यांनी सकारात्मक आश्वासन दिले.
या बैठकीमध्ये प्रामुख्याने अरविंदो कोलमाईन्स कंपनीचे नवीन आलेले प्रोजेक्ट हेड श्री वेंकट रेड्डी, सामाजिक कार्यकर्ता श्री मनोज दादा ठेंगणे( माजी सैनिक), मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष श्री अमन भाऊ आंदेवार, श्री किरण भाऊ ठाकरे (महानगर बजरंग दल अध्यक्ष चंद्रपूर), श्री मनोज घोटेकर (महानगर जिल्हा संयोजक बजरंग दल),श्री आकाश वानखेडे(भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष),श्री मनोज जाधव (सामाजिक कार्यकर्ता), श्री.विस्मय बहादे(भाजयुमो भद्रावती तालुका महामंत्री),श्री.वसंता सातपुते,श्री.विठठल देहारकर,श्री रोहित थोर या सर्व मान्यवराची प्रामुख्याने उपस्थिती होती.