▪️विश्वशांती विद्यालय कुनघाडा रै येथे संविधानाची ७५ वी कार्यक्रम संपन्न..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
कुनघाडा रै – ( इंडिया 24 न्यूज ) : अनुलोम संस्था मुंबई यांच्या वतीने विश्वशांती विद्यालय कुनघाडा रै येथे संविधानाची ७५ वी कार्यक्रम पार पडला
सदर उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे वक्ते ॲड डॉ.रत्नघोष ठाकरे बोलताना म्हणाले की ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना संविधान याविषयी अधिक माहिती व्हावी व भावी पिढी सक्षम व सुजान नागरिक बनून आपल्या देशातील सार्वभौमता, समानता, स्वातंत्र्य, बंधुता याआधारावर लोकशाही बळकट करण्यासाठी अनुलोम संस्थेने पुढाकार घेऊन सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. आर. मेश्राम हे होते तर वक्ता म्हणून ॲड डॉ.रत्नघोष ठाकरे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभाग प्रमुख अमित मोरांडे, विनायक कुनघाडकर, होमेश्वर बाळबुद्धे होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व व मानवी जीवन पटवून देताना म्हणाले की जगात जेवढे देश आहेत त्यापैकी आपल्या देशांचे संविधान हे सर्वश्रेष्ठ असून त्यात पर्यावरण,संस्कृती, जातीभेद विरहीत समाज व्यवस्था अबाधित टिकवण्यासाठी पुढच्या पिढीने तसे विचार आत्मसात करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एस आर मेश्राम यांनी आजच्या संविधान कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना संविधानाची माहिती विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत करून देत असल्याने निश्चितच विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात सजग नागरिक बनण्यासाठी उपयोगात येईल असे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक कुनघाडकर अनुलोम भाग जनसेवक यांनी केले. तर आभार गुरुदास कन्नाके यांनी मानले.