आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न..

▪️चामोर्शी केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयात येथील घटना. शिक्षकांवर कारवाईची मागणी..

 

मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभुळकर

चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : शहरातील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांला येथील शिक्षकाकडून नेहमी मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू होता. या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्यांने आत्महत्या करण्या सारखे टोकाचे पाऊल उचलले.मात्र शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सतर्कतेने प्रयत्न फसला. अनिकेत गजेंद्र सोनटक्के वय २४ रा. आरमोरी असे विद्यार्थ्यांचे नाव असून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शिक्षकांचे तुषार भांडारकर व पवन दुधबावरे असे नावे आहेत.
अनिकेत सोनटक्के हा विद्यार्थी चामोर्शी शहरातील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयात पदवी पूर्ण करण्यासाठी शिक्षण घेत आहे. हे खाजगी कृषी महाविद्यालय आहे. येथील शिक्षकांकडून नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने विद्यार्थ्यांना नाहकत्रास देण्याचा प्रयत्न दिसून येतो. व विद्यार्थिनींना वाईट नजरेने बघतो मुलींची छेड काढत असतो मुली आपल्या अब्रूला घाबरून सदर शिक्षकाची तक्रार करत नाहीत.त्यामुळे येथील शिक्षकाची हिम्मत वाढल्याचे या प्रकरणावरून दिसून येते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हा हेतू बाजूला सारून उलट तुम्हाला पास व्हायचे असेल तर मला पैसे द्या नाहीतर तुम्हाला आम्ही नापास करू, पदवी पूर्ण करण्यास १० वर्षे लावू, हे सर्व आमच्याच हातात असते.आम्ही गुपीत सूचना दिलेल्याच पालन करा अन्यथा परीक्षेत नापास व्हा असा अप्रत्यक्ष मानस खचविण्याचा प्रयत्न नेहमीच शिक्षकाचा दिसून येतो. या त्रासाला कंटाळून अनिकेतने आयुष्य संपविण्याचा विचार केला.असं आत्महत्या करण्यापूर्वी आपण कशामुळे आत्महत्या करीत आहोत असे एका चिठ्ठीत लिहून ठेवले होते.परंतु विद्यार्थ्यांच्या सतर्कतेने हा संपूर्ण प्रयत्न फसला आणि विद्यार्थ्यांला जीवदान मिळाले. एक चुकीच्या शिक्षकांमुळे नाहक विद्यार्थ्यांचा जीव गेला असता. परंतु नशीब बलवान असल्याने अनिकेतचा जीव वाचला.अशा शिक्षकावर संस्था चालकांनी कठोर कारवाई करण्याची मागणी पालकवर्गानी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.