▪️वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी..

डॉ. आनंदराव कुळे
मुल तालुका प्रतिनिधी
मो. क्र.९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मुल तालुक्यातील मारोडा जंगलातील कक्ष क्र.३५० मध्ये गुरे चारण्या करीता गेलेल्या मौजा आदर्श खेडा (मारोडा) येथील गणपत बालाजी मानेवार वय (६० ) ह्याचेवर हल्ला करून नरभक्षी वाघाने हल्ला करुन मान पकडली व त्याला जखमी केल्याची घटना आज दिनांक १९ जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली. अशाही परिस्थितीत जखमी गणपत मानेवार हे वाघाच्या तावडीतून सुटून एक ते दीड की.मी. अंतर पायी चालत गावाकडे आला. घडलेल्या घटनेची माहीती होताच वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक आर. सी. पेदापल्लीवर यांनी तात्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली.व लागलीच जखमी गणपत बालाजी मानेवार यांना उपजिल्हा रूग्णालय मूल येथे उपचारासाठी नेण्यात आले. गुराखी गणपत यांच्या मानेवर जखमा असल्याने अधिक रक्तस्राव होऊ नये म्हणून जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याचे क्षेत्र सहाय्यक पेदापल्लीवार यांनी सांगितले. या घटनेत वनरक्षक दुधे, वनमजूर यांनी सहकार्य केले. या वनपरिक्षेत्राचे अधिकारी हे मुख्यालयी नसल्याचे समजले. या वन परिक्षेत्रात नरभक्षी पट्टेदार वाघ फिरत आहे. त्यामुळे नागरिकांनी व गुराखी यांनी आपल्या जीवाच्या रक्षणासाठी जंगल परिक्षेत्रात जाण्याचे टाळावे. असे वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे.