ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची वसतिगृहाला भेट

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : २६ ऑगस्ट : गडचिरोली येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह क्र. १ व २ येथे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आज सायंकाळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक व दैनंदिन अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी वाचनालय, संगणक कक्ष, वसतिगृहातील विविध सुविधा तसेच संपूर्ण परिसराची पाहणी करून उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. वाचनालयात पुस्तकांची कमतरता असल्याचे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर येत्या सात दिवसांत आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

तसेच _MPSC, UPSC, JEE, NEET आणि MHT-CET_ यांसारख्या स्पर्धा व प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन व आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. वसतिगृहातील इतर समस्या संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून प्राधान्याने सोडविण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी योग्य वातावरण आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा मिळणे ही आपली प्राथमिकता आहे,” असे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सुरजजी पोटावी, संकेतजी कुनघाडकर, वसतिगृह क्र. १ चे अधीक्षक विश्वजीतजी काळे, वसतिगृह क्र. २ चे अधीक्षक योगेशजी फुसे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.