ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️टिपागड येथे ‘Trek With MLA’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

गडचिरोली जिला ब्युरो चीफ: उज्वल देवनाथ

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या संकल्पनेतून गडचिरोलीच्या पर्यटनाला नवी दिशा; पावसातही युवकांचा उत्साह कायम

टिपागड, ता. कोरची : गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना व्यापक ओळख मिळवून देण्यासोबतच जिल्ह्यातील निसर्गसंपदा, आदिवासी संस्कृती आणि साहसी पर्यटनाची क्षमता देशभर पोहोचविण्याच्या उद्देशाने आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या संकल्पनेतून टिपागड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘Trek With MLA’ उपक्रमाला गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यातून मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भाजपा युवा मोर्चा, गडचिरोली आणि Sobay Tourism LLP (TRIBee Tours) यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुसळधार पाऊस, अवघड चढाई आणि प्रतिकूल हवामानाची कोणतीही पर्वा न करता युवक, ज्येष्ठ नागरिक, पर्यटक, निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि बाईक रायडर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले. पावसात बाईक राईड करत टिपागड गाठल्यानंतर सहभागींच्या उत्साहात ट्रेकला सुरुवात झाली. मुसळधार पावसातही उत्साह कायम राहिल्याने संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.

“पाऊस आला… पण उत्साह थांबला नाही!” या भावनेतून सहभागीांनी टिपागडच्या सान्निध्यात निसर्ग, श्रद्धा, संस्कृती आणि साहसाचा सुंदर संगम अनुभवला. बाईक राईड आणि त्यानंतरचा टिपागड ट्रेक हा सहभागींसाठी अविस्मरणीय अनुभव ठरला.

टिपागड हे केवळ निसर्गरम्य पर्यटनस्थळ नसून आदिवासी समाजाच्या श्रद्धा, परंपरा, संस्कृती आणि आध्यात्मिक वारशाशी जोडलेले अत्यंत महत्त्वाचे पवित्र स्थान आहे. त्यामुळे टिपागडच्या धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वासोबतच येथील निसर्गसंपदा आणि साहसी पर्यटनाची क्षमता व्यापक स्तरावर पोहोचविणे आवश्यक आहे. याच उद्देशाने आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या संकल्पनेतून ‘Trek With MLA’ सारख्या उपक्रमांना चालना दिली जात आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या पर्यटनाला नवी ओळख मिळावी, स्थानिक युवकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि स्थानिक आदिवासी संस्कृती व परंपरांना व्यापक व्यासपीठ मिळावे, यासाठी पर्यटनाच्या विकासाला प्रोत्साहन देण्याचा निर्धार आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी व्यक्त केला. गडचिरोलीतील दुर्गम आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळे राज्याच्या तसेच देशाच्या पर्यटन नकाशावर आणण्यासाठी लोकसहभागातून असे उपक्रम अधिक व्यापक करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, ज्येष्ठ नेते विजयजी कुमरे, महिला आघाडी जिल्हा महामंत्री लताताई पुंगाटे, गडचिरोली को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक गजाननजी साळवे, भाजपा जिल्हा सचिव सारंगजी साळवे, भाजपा तालुकाध्यक्ष गडचिरोली दत्तुजी सूत्रपवार, भाजपा तालुकाध्यक्ष धानोरा साजनजी गुंडावार, भाजपा तालुकाध्यक्ष कुरखेडा चांगदेवजी फाये, नगरसेवक न.प. धानोरा तथा गटनेते संजयजी कुंडू, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष तथा महिला व बाल कल्याण सभापती न.प. गडचिरोली सीमाताई कन्नमवार, नगरसेविका ज्ञानेश्वरीताई धंदरे, साक्षीताई बोलूवार, शिल्पाताई हेमके, नगरसेविका प्रतीक्षाताई गुंडावार, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष रजतजी वंजारी, भाजयुमो जिल्हा महामंत्री पवनजी रामगिरकर, भाजयुमो शहराध्यक्ष साईजी सिलमवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष ब्रह्मपुरी इंजि. अविनाशजी मस्के, भाजपा गडचिरोली तालुका महामंत्री कीर्तिजी मासुरकर, श्रीकांतजी पतरंगे, अविनाशजी विश्रोजवार, भाजपा धानोरा तालुका महामंत्री सुभाषजी धाईत, आदिवासी आघाडी गडचिरोलीचे कृष्णाजी चंद्रमा, अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष कुरखेडा अंगराजजी कराडे, आदिवासी आघाडी तालुका महामंत्री कुरखेडा हरिदासजी कुजाम, बूथ प्रमुख जांभुरखेडा धर्माजी दरवडे, सामाजिक कार्यकर्ते कैलासजी उईके, राकेशजी दास, राकेशजी खरवडे, गजाननजी परचाके, प्रकाशजी कुर्जेकर, विष्णुजी हलदर, विद्यार्थी आघाडीचे संयोजक तेजसजी दोनाडकर, सोशल मीडिया संयोजक धीरजजी पाल, जयपालजी उरकुडे, अमोलजी भोयर यांच्यासह भाजयुमो गडचिरोली, धानोरा, कुरखेडा व ब्रह्मपुरी येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील युवक, ज्येष्ठ नागरिक, पर्यटक, ट्रेकर्स, बाईक रायडर्स आणि निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून ‘Trek With MLA’ उपक्रमाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. गडचिरोलीच्या पर्यटनाला नवी ओळख देण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाची पुढील टप्प्यात अधिक व्यापक स्वरूपात अंमलबजावणी करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.