आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️साखरेवरील दरवाढ त्वरित मागे घेवून लाडक्या बहिणींसह सर्व जनतेला दिलासा द्यावा : जर्नलिस्ट माधुरी कटकोजवार यांची मागणी..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : सध्या सणासुदीचा हंगाम सुरू झाला असताना मोदी फडणवीस सरकार ने गोड पक्वान्न बनविण्यासाठी लागणारी व 40-45 रुपये कीलो मिळणारी साखर एकदम 70-75 रु. प्रती कीलो एवढी प्रचंड दरवाढ केल्याने गृहीणींचे बजेट पार बिघडून गेले आहे. महाराष्ट्रातील फडणवीस -शिंदे -पवार सरकारने लाडक्या बहिणींना 1500 रुपये प्रति माह अनुदान देण्याची घोषणा करुन लाखों लाडक्या बहिणींची मते आपल्या पदरात पाडून घेतली. परंतु याच सरकार ने साखरेच्या दरात प्रचंड दरवाढीचा निर्णय घेवून सरकारने लाडक्या बहिणींचा अप्रत्यक्षपणे विश्वासघातच केला असल्याचे चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा व जर्नलिस्ट माधुरी कटकोजवार (मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन) यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र सरकार ने राज्यातील लाडक्या बहिणींसह सर्व जनतेला दिलासा देण्यासाठी त्वरित ही साखरेची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणीही माधुरी कटकोजवार यांनी सरते शेवटी एका पत्रकाद्वारे केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.