▪️वीजचोऱ्या करणाऱ्यांना ‘शॉक’ चंद्रपूर परिमंडळात ६७४ वीजचोऱ्या उघड..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : २८ ऑगस्ट २०२६:- चंद्रपूर परिमंडळात वीजचोरी करणाऱ्यांना महावितरणने चांगलाच शॉक दिला आहे. गेल्या पाच महिन्यात वीजचोरांविरोधात केलेल्या कारवाईत घरगुती, व्यवसायिक, औद्योगिक तसेच इतर वर्गवारीमधील ६७४ ग्राहकांची वीजचोरी उघड झाली. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ३१० आणि गडचिरोली जिल्ह्यातील ३६४ वीजचोऱ्या समोर आल्या आहेत. वीजचोरीच्या संपूर्ण रकमेचा दंडासह मुदतीत भरणा केला नसल्यामुळे ७ वीज ग्राहकांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.
‘महावितरण’ने वीजचोरीला चाप लावण्यासाठी एप्रिल पासून घरगुती, व्यवसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीज जोडण्याची धडक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ३१० वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. त्याची रक्कम ५१ लाख ५९ हजार ३१४ वीजचोऱ्यांचे मूल्यांकन झाले तसेच गडचिरोली जिल्ह्यातील ३६४ वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत त्याची रक्कम ४८ लाख ७५ हजार ८९५ वीजचोऱ्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. चंद्रपूर परिमंडळातील ग्राहकांनी एकूण रक्कम १ कोटी ३५ हजार २०९ एवढ्या रकमेचा भरणा केला आहे.



