आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️पो.स्टे. मूल हद्दीत गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई..

▪️एकूण 45 लाख 55 हजार रु.चा मुद्देमाल जप्त पोलीस स्टेशन मूल ची कामगिरी..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*

मूल – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता मूल पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोस्टे हद्दीत मौजा बेंबाळ चौकीसमोरील रस्त्यावर नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान 08 बोलेरो पिकअप वाहनचालक आपापल्या ताब्यातील वाहनांमध्ये अवैधरीत्या एकूण 24 गोवंश जनावरांना चारा-पाण्याची सोय न करता, वेदना पोहोचवून कत्तल व विक्री करण्याच्या उद्देशाने नेत असल्याचे आढळून आले. या कारवाईत 5,55,000/- रु. किमतीचे 24 गोवंश बैल व वाहतुकीसाठी वापरलेली 40,00,000/- रु. किमतीची 08 पिकअप वाहने असा एकूण 45,55,000/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला

याप्रकरणी आरोपी नामे (1) महेश देवीदास फटींग वय 37 वर्ष रा. कुंझा, (2) किशोर सेवक नागपुरे वय 38 वर्ष रा. बोंडेगाव, (3) विक्की धनपाल देशमुख वय 28 वर्ष रा. वेडवा, (4) अंकुश देवराव मेंढुले वय 48 वर्ष रा. पवनी, (5) दिपक यादव चुनरी वय 42 वर्ष रा. व्याहाड खुर्द, (6) दिपक योगराज कांबळे वय 25 वर्ष रा. किटाळी, (7) दिगंबर मंगरू मुनघाटे वय 36 वर्ष रा. आंबेशिवणी, आणि (8) राहुल मोरेश्वर चौधरी वय 36 वर्ष रा. चकपिरंजी यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन मूल येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 5 (क), 9 सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 1960 चे कलम 11(1) (डी) (एच) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोहवा/1703 इदल राठोड करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री. आयुष नोपानी पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. ईश्वर कातकडे – अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि श्री. सत्यजित आमले उपविभागीय पोलीस अधिकारी मूल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विजय राठोड यांचे नेतृत्वात सपोनि सुरेश कन्नाके, पोउपनि रूपेश कुंभरे, पोउपनि उमेश पिपरे, पोउपनि व्यंकटेश दोनोंडे, पोहवा/1703 इदल राठोड, पोहवा/522 सुनिल कुळमेथे, पोअं/2710 दिलीप आदे, पोअं/2623 नरेंद्र वाकडे, पोअं/2394 प्रकाश चिकराम, पोअं/1232 शंकर बोरसरे आणि पोअं/2678 प्रमोद सावलसाकडे सर्व पोस्टे मूल यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.