आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️सिरोंच्यात आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित रकमेचा प्रश्न ऐरणीवर; CPI चा आंदोलनाचा इशारा..!!

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ
सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : येथे कोरोना महामारीच्या काळात सेवा बजावणाऱ्या आशा स्वयंसेविकांची प्रलंबित प्रोत्साहनपर रक्कम तातडीने वितरित करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. भाकपाचे गडचिरोली जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली, सिरोंचा तालुका सचिव कॉ. रवि बारसागंडी यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले. कोरोना काळात आशा स्वयंसेविकांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले. त्यामुळे त्यांची प्रलंबित रक्कम तातडीने वितरित करावी आणि विलंबाची कारणे स्पष्ट करावीत, अशी मागणी करण्यात आली. मागणीची दखल न घेतल्यास आशा स्वयंसेविकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाकपाने दिला.



