आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️राजुरा पोलिस स्टेशन कडून आंतरराज्यीय चोरट्यांचे टोळीचा पर्दाफाश.

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : पोलीस स्टेशन राजुरा येथे फिर्यादी नामे राकेशकुमार देवीलाल रांगडाले वय ४७ वर्ष, व्यव -, रा. रिंग रोड न.२ श्रेया कॉम्पलेक्श जवळ ताटीबंद रायपुर ता जि रायपूर राज्य छत्तीसगढ, यांनी फिर्यादी दिली कि दिनांक ०८/१०/२०२६ रोजी आमचे एसव्हीए ट्रॉन्सपोटींग कंपनीचे दोन गाडी ट्रक क्र. सी जी २२ ए. के ७९८२ आणि ट्रक क्र सी जी २२ एके ९२०० या दोन ट्रक गाडीमध्ये कोलफाईंस हा माल रायपुर येथुन भाटीया कोल वॉषरी पांढरपौनी ता राजुरा जि चंद्रपुर येथे आलेल्या होत्या. तेथे माल खाली केल्यानंतर दोन्ही ट्रक हे लॉयडस मेटल राजुरा रेल्वे सायटींग येथे माल भरण्यासाठी निघाल्या होत्या. ट्रक क्र. सी जी २२ एके ७९८२ हीचा चालक पुस्पेंद्र कुसवाह वय २४ वर्ष, आणि ट्रक क्र सी जी २२ एके ९२०० याचे चालक दिपक कुसवाह यांचे फोन दिनांक ०९/१०/२०२६ रात्री ११/०० वाजता बंद झाले होते. त्यानंतर लॉयडस मेटल राजुरा रेल्वे सायटींग येथुन मला इम्रान पठाण सिक्युरीटी सुपरवायजर यांनी यावरून फोनकरून मला सांगीतले की, आपल्या ट्रक गाडी अदयापपर्यंत माल भरण्यासाठी आलेल्या नाहीत. त्यामुळे मी दोन्ही ट्रकचे जीपीएस लोकेषन पाहीले असता, ते रेल्वे सायटींग ठिकाणचे होते. त्यावेळी मी त्यांना आमचेकडील तुमचे ऑफिसचे बाजुला लावुण असलेले आहेत असे सांगीतले. त्यामुळे त्यांनी सदर ठिकाणी जाउन पाहीले असता, त्यांनी मला सांगीतले की, आपले दोन्ही ट्रक येथे आहेत परंतु त्या दोन्ही ट्रकचे एकुण १७ टायर डिस्कसहीत काढलेले आहेत. त्यामुळे दोन्ही ट्रक माल भरणे योग्य नाहीत. सदर माहीती मी माझे मालक श्री विनीतकुमार जैन यांना देवुन त्यांचेसह दिनांक १०/१०/२०२६ रोजी, लॉयडस मेटल राजुरा रेल्वे सायटींग याठिकाणी येउन आमचे दोन्ळी ट्रक गाडी यांची पाहणी केली असता, दोन गाडी ट्रक क्र. सी जी २२ एके ७९८२ हीचे डिस्क सहीत ९ टायर तसेच ट्रक क्र सी जी २२ एके ९२०० हीचे ८ टायर असे एकुण १७ टायर त्यांची एकुण किंमत रू २,५०,०००/-रूपये हे चोरी केले.. अशा फिर्यादीचे तोडी रिपोर्ट वरुन पो स्टे ७७९/२०२६ कलम ३०३ (२) ३ (५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वय सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेतात. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांचे नेतृत्वाखाली डि. बी इंचार्ज सपोनी लक्ष्मण लोकरे. पोउपनि सुनिल धांडे व सोबत डी.बी पथक यांनी गुन्हयातील आरोपीचा शोध करीत असतांना गोपनीय बातमीदार सायबर सेल तात्रींक बाबी कडुन मिळालेल्या माहीतीवरुन खालील नमुद आरोपीतांना चकौडीया जिल्हा शहडोल राज्य मध्यप्रदेश यास ताब्यात घेवुन अटक केली व त्यांच्याकडुन गुन्हयात दाखल असलेल्या ट्रकचे टायर खालीलप्रमाणे जप्त केले आहे.

पोलीस स्टेशन अप क्र 779/2026 कलम 303 (2) 3(5) भा.न्या.सं आरोपीचे नाव -1) रामलाल गिरधारी यादव वय 27 वर्ष व्यव-मजुरी जात यादव रा. चकौडिया

जि शहडोल मध्यप्रदेश 02) अजय श्रीकाशी पेटल वय 30 वर्ष व्यव मजुरी जात पेटल रा. ब्यौहारी जि शहडोल

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.