ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️तलावात बुडून इसमाचा मृत्यू ..

 

मुख्य संपादक – श्री. तुळशीराम जांभूळकर

सिंदेवाही – ( इंडिया 24 न्यूज ) : तालुक्यातील कच्चेपार येथील कु.प्रफुल देविदास मेश्राम रा.कच्चेपार वय 24 वर्षे या इसमाचा तलावात बुडून मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे की नंबर 2 चे तलावात दि.13.9.2023 रोजी सकाळी अंदाजे 5.00 वाजताचे सुमारास मय्यत प्रफुल्ल मेश्राम, अरुण गेडाम, नंदकिशोर मेश्राम, लक्ष्मण मेश्राम हे मासे पकडण्यासाठी जाळे टाकत असताना, प्रफुल्ल हा खोल पाण्यात गेला. हा इसम अपंग असल्यामुळे तो पाण्यात डुंबून मृत्यू पावला. साथीदारानी वाचविण्याचा प्रयत्न केला. परंंतू त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती पोलीस पाटील श्री. दत्तू हटवादे यांना देण्यात आली. यांनी पोलीस स्टेशन शिंदेवाडी येथे घटनेची माहिती दिली. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक श्री भास्कर व्हि. ठाकरे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. गावातील लोकांच्या साह्याने सकाळी 7.35 वाजता मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक श्री ठाकरे यांनी मोक्का स्थळ पंचनामा केला. तेव्हा पोलीस पाटील हटवावे उपसरपंच कोवे सदस्य सोनटक्के नेवारे व गावातील नागरिक उपस्थित होते. पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी शिंदेवाही रुग्णालय येथे रवाना करण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.