ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

सहा महिन्यांनी पैसे खात्यावर वर्ग

तक्रार करताच रिझर्व्ह बँकेकडून २१ पट परतावा

 

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

मनमाड ता. १४ (इंडिया 24 न्यूज )ऑनलाइन व्यवहार करताना व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. परंतु खात्यातून पैसे कापले गेल्याने संबंधिताने याप्रकरणी तक्रार केल्यानंतर सहा महिन्यांनी तरुणाच्या खात्यात कापलेली रक्कम वर्ग करण्यात आलो. रक्कम खात्यावर वर्ग करण्यास सहा महिन्याचा कालावधी का लागला ? याबाबत रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करताच तक्रारदारास रिझर्व्ह बँकेने २१ पट परतावा देत त्याच्या खात्यात १८ हजार रुपये खात्यात जमा केले.

मनमाड येथील अविराज बापू जगताप या युवकाचे येथील स्टेट बैंक

ऑफ इंडिया बँकेच्या मनमाड शाखेमध्ये गेल्या ९ वर्षांपासून बचत खाते आहे. अविराज याने १४ फेब्रुवारी २०२१ रोजी रुपये ८५० रुपये ऑनलाइन योजविल भरणा करत असताना त्यात काही तांत्रिक कारणांमुळे सदर व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. परंतु जगताप यांच्या खात्यामधून ८५० रुपये वजा करण्यात आले. व्यवहार पूर्ण झाला नसला तरी २४ तासांमध्ये गेले पैसे परत येतील या आशेवर अविराज याने यांनी दुसऱ्या दिवशी आपले बँक खाते तपासले असता त्याच्या बँक खात्यात सदर रक्कम बँकेकडून परत करण्यात आली नाही. त्यामुळे अविराज यांनी बँकेसह भीम युपीआय अपवर असलेल्या तक्रार

निवारण केंद्राच्या फोन क्रमांकावर संपर्क साधत तक्रार नोंदवली. परंतु तक्रार करून त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर १८ ऑगस्ट २०२१ रोजी तब्बल १८६ दिवसांनी अविराज यांच्या खात्यावर ८५० रुपये खात्यात जमा करण्यात आले. व्यवहार पूर्ण न होताच पैसे कापल्यानंतर २४ तासात पैसे पुन्हा खात्यात येणे अपेक्षित असताना त्यासाठी सहा महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लागल्याने श्री. जगताप यांनी याप्रकरणी पैसे उशिरा जमा झाल्यामुळे मला भरपाई मिळावी यासाठी रिझव्ह बँकेकडे याबाबत तक्रार करत उशिराने आलेल्या परताव्याची प्रतिदिन १०० रुपये प्रमाणे १८५ दिवसांची भरपाई खात्यावर जमा केला.

C माझा ऑनलाइन व्यवहार पूर्ण न झाल्यावरही पैसे खात्यातून वजा झाले मी ऑनलाइन तक्रार केली परंतु १८६ दिवसांनी पैसे जमा केले असले तरी इतक्या उशिराने पैसे का जमा करण्यात आले. यासाठी रिझर्व्ह बँकेकडे तक्रार केली होती. माझ्या तक्रारीवरून बँकेकडून २१ पट रक्कम परत मिळाली.

अविराज जगताप, तक्रारदार

मिळवून द्यावी यासाठी अर्ज केला असता रिझव्ह बँकेने अविराज यांची तक्रार मान्य करत ८५० रुपये रक्कमेच्या २१ पट अर्थात १८ हजार रुपयांचा परतावा देण्याचे आदेश दिलेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.