ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जिल्हाधिकाऱ्यांनी केली धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पाहणी..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

धुळे : दिनांक 21 सप्टेंबर, 2023 ( इंडिया 24 न्यूज ) : धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव, हरणमाळ तलाव तसेच अक्कलपाडा धरणावरील उजव्या कालव्यावरील गोताणे, उडाणे येथील पाझर तलावाची आज जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पाहणी केली.

सद्यस्थितीत नकाणे तलावात कमी पाणीसाठा असल्यामुळे धुळे शहरातील पिण्याचे पाण्याची गरज भागविण्यासाठी हरणमाळ तलावातून नकाणे तलावात पाणी सोडण्यात आले असून या पाण्यामुळे नकाणे तलावातील पाणी पाणीपातळी वाढ होत आहे. हरणमाळ तलावाची पाणी पातळी कमी झाल्यावर त्यात एक्स्प्रेस कॅनॉलने पाणी सोडण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.गोयल यांनी उडाणे गावातील गावकरी, संबंधीत लोकप्रतिनिधी तसेच जलसंपदा कार्यालयातील अधिकाऱ्यांशी कालवा आवर्तन तसेच गावकऱ्यांच्या समस्याबाबत चर्चा केली. उजवा कालवा लाभक्षेत्रातील सर्व गावात पाझर तलाव व कालव्याद्वारे पुरेशा प्रमाणात आवर्तन चालू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सद्य:स्थितीमध्ये उजव्या कालव्यावरील उडाणे पाझर तलाव भरला असून त्यापुढील सांजोरी तलाव नंतर कुंडाणे पांझर तलाव भरुन त्यानंतर एक्स्प्रेस कॅनॉलने हरणमाळ तलावात पाणी सोडण्यात येणार आहे.

यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता पी.जी.पाटील, कार्यकारी अभियंता श्री.वट्टे, सहाय्यक अभियंता श्री.गोताणे, शाखा अभियंता श्री.महाले, श्री.खैरनार उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.