ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

भारत राष्ट्र समितीची गाव तिथे शाखा स्थापन करा – गजानन हरणे

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

अकोला – ( इंडिया 24 न्यूज ) : भारत राष्ट्र समिती(B.R.S) च्या वतीने दोन ऑक्टोंबर ते 16 ऑक्टोबर पर्यंत अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये जनजागृती पंधरवड्याचे आयोजन केले असून या पंधरवड्यामध्ये भारत राष्ट्र समितीचे ध्येय धोरण उद्देश गावागावात पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे .त्यासोबत गावागावात बैठका घेऊन गावा तेथे शाखा स्थापन करण्याचे काम चालू आहे. त्यातीलच एक भाग म्हणून दिनांक ३/१०/२३ ला येळवण येथे हनुमान

मंदिरामध्ये बैठक उपसरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाली .या बैठकीला अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक माननीय गजानन हरणे यांनी मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनात त्यांनी समितीची सविस्तर माहिती देऊन गाव तेथे समितीच्या शाखा स्थापन करण्याचे आव्हान ग्रामस्थांना केले. यावेळी येळवण गावाची भारत राष्ट्र समितीची शाखा स्थापन करण्यात आली. गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या बैठकीला प्रतिसाद दिला होता.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.