ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

आप खासदार संजय सिंग यांच्या अटकेचा शहर काँग्रेस तर्फे जाहीर निषेध

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

घुग्घूस : देशात मोदी सरकारच्या जनविरोधी निर्णया विरोधात आवाज उठविणारे विरोधीपक्षाचे नेते,पत्रकार यांच्यावर ईडीच्या माध्यमातून कारवाई करून विरोधकांचे तोंड बंद करण्याचा दबावतंत्र मोदी शासनातर्फे केला जात आहेत.

याच ईडीच्या माध्यमातून विरोधीपक्षाचे अनेक नेते भाजपात भीतीने गेले असून अनेक राज्य सरकारे पाडून भाजपाची सत्ता बसविण्यात आली आहे.

निवडणुका जश्या – जश्या जवळ येत आहेत तसे – तसे ईडीच्या कारवाई वाढत आहे

आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग यांना ईडीने 04 ऑक्टोबर रोजी सांयकाळी साडे पाच वाजता दारू घोटाळ्यात अटक केली

सदर अटक हे मोदी सरकारच्या निर्देशानुसार कट कारस्थानातून करण्यात आला असल्याचा ठपका ठेवत इंडिया गठ्बांधनाचे घटक पक्ष काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी व महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांच्या नेतृत्वाखाली जनसंपर्क कार्यलया परिसरात दिनांक 05 ऑक्टोबर रोजी दुपारी 01 वाजता करण्यात आला

याप्रसंगी मोदी शासना विरोधात
जोरदार घोषणाबाजी करण्यात आले याप्रसंगी काँग्रेस महिला शहर अध्यक्ष संगिता बोबडे,जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी,जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद,एस.सि.सेल शहर अध्यक्ष दिप्ती सोनटक्के,जिल्हा सचिव दुर्गा पाटील,संध्या मंडल,जिल्हा सचिव मंगला बुरांडे,जिल्हा महासचिव पुष्पा नक्षीने,सरस्वती कोवे,सुजाता सोनटक्के,पूनम कांबळे,प्रीती तामगाडगे,रिना हाडगे,लक्ष्मी गोदारी,गोल्ममा ,काँग्रेस नेते सैय्यद अनवर,मुन्ना लोहानी,अलिम शेख,रोशन दंतलवार,तिरुपती महाकाली,विशाल मादर,रोहित डाकूर,अरविंद चहांदे,सुनील पाटील,शहजाद शेख,कपील गोगला,कुमार रुद्रारप,सोमेश रंगारी,अजय त्रिवेणी,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.