ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

देवी – देवतांच्या प्रतिमेचे सन्मानाने विसर्जन होण्यासाठी दीक्षित तलावाचे खोलीकरण व सौंदर्यकरण करा

राजुरेड्डी यांची नगरपरिषदेला मागणी

*🔸अरविंद चहांदे*

*🔸चंद्रपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी*

*🔸मो.940571416

5*

घुग्घूस : शहराच्या मध्यभागात असलेल्या दीक्षित तलावात सर्वत्र घाण पसरली असल्याने शहरातील नागरिक श्रीगणेश विसर्जन व नवरात्रीत दुर्गा माता व सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे विसर्जन करण्यासाठी म्हातारदेवी शेंणगाव येथील तलावावर जातात

नुकतेच साई नगर येथे पाहुणा म्हणून आलेला सुमित पोंगळे या वीस वर्षीय युवकांचा शेंणगाव येथील तलावात बुडून मृत्यू झाला हे शहरातील नागरिकांसाठी दुःखद बाब आहे.

शहरातील दीक्षित तलावाचे चंद्रपूरच्या रामाला तलावाच्या धर्तीवर खोलीकरण, स्वच्छता व सौंदर्यकरण करावे जेणेकरून नागरिकांना एक पर्यटन स्थळ निर्माण होईल अशी मागणी काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांनी नगरपरिषदे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांना शिष्टमंडळासह निवेदनातून केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.