ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मराठायोद्धा गजानन हरणे यांच्या समर्थनार्थ पीकेव्ही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे एक दिवसीय उपवास, मुंडन आंदोलन देवीचा गोंधळ..

 

संपादक – 🔹शिल्पा बनपूरकर

अकोला – ( इंडिया 24 न्यूज ) : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ व मराठा आरक्षण मिळावे म्हणून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजसेवक तथा मराठायोद्धा गजानन हरणे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस.आज त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाजात तिव्र पडसाद उमटले. त्यांच्या समर्थनार्थ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी आज एक दिवसाचा उपवास केला. तुषार जायले यांच्या मार्गदर्शनात गोंधळी समाजातर्फे मुक्या बहिऱ्या शासनाला गोंधळ घालून जागृत करण्यात आले.तसेच बाळू पाटील ढोले यांच्या नेतृत्वात मुंडण आंदोलन करून शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला .आजही हरणे यांच्या उपोषणाला जिल्ह्यातून ग्रामीण व शहर भागातून मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रतिसाद मिळाला .त्यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील अनेक गावामध्ये आंदोलने सुरू करण्यात आली आहेत. गजानन हरणे यांच्या उपोषणाला पाच दिवस झाले तरी शासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे जनतेमध्ये असंतोष पसरत असून वेगवेगळ्या प्रकारचे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अनेक सामाजिक संस्था संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दिला आहे त्यामध्ये

राष्ट्रवादी युवक काँग्रेस, समस्त गावकरी युवक मंडळी भौरद, पंजाबराव कृषी विद्यापीठ महाविद्यालयाचे मराठा समाजाचे विद्यार्थी विद्यार्थिनी, मराठा सेवा मंडळ अकोला, मराठा सेवा महिला मंडळ अकोला, ग्रामीण पत्रकार संघ, राष्ट्रीय किसान परिषद, वंचित बहुजन आघाडी मनपा , अकोला जिल्हा छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचा संघ जिल्हा फेडरेशन, विद्यार्थी संघटना अकोला जिल्हा, वंचित बहुजन आघाडी महिला शाखा अकोला, शिवसेना शहर, निर्भय बनो जन आंदोलन, शिवसेना ग्रामीण अकोला, बचपन बचाव संघटना महाराष्ट्र राज्य, धैर्यशील शिक्षण संस्था अकोला, ग्रामपंचायत भौरद, आज विविध पक्षाच्या व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन समर्थन दिले यामध्ये माजी आ. बबनराव चौधरी, राम पाटील हिंगणकर, काँग्रेसचे अविनाश देशमुख, तुषार जायले, डॉ सुभाष कोरपे, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे संजय वानखडे, आरपीआयचे गजानन कांबळे, जि प उपाध्यक्ष सुनील फाटकर, वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर ,शहर प्रमुख राजेश मिश्रा सरपंच कावसा मोहन सावरकर,जी. प सदस्य विनोद देशमुख, राजू पाटील सभापती मुर्तीजापुर झुंज सामाजिक संघटना प्रशांत भारसाकळ आदींचा समावेश होता. मोबाईल नंबर अनेक लोकांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन संघटनेला पाठिंबा देऊन शासनाचा निषेध केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.