ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️लॉयडस मेटल कंपनी ओकते लोह्याचे कण..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभूळकर

घुग्घुस – ( इंडिया 24 न्यूज ) : घूग्घुस शहर हा औद्योगिक शहर म्हणून ओळखला जातो आणि घुग्घुस मधील लायडस मेटल कंपनीचा होणार्‍या प्रदुषण व अपघाताबाबत दरवेळेस चर्चेत असणारी कंपनी आहे. प्रदुषण ऐकले धुळ हवा पाणी ध्वनी परंतु लायडस मेटल कंपनी तर चक्क लोह्याचे कण सोडते.
आज दि.6 नोव्हेंबर 2023 रोजी सफेद झंडा कामगार संघटना अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांना स्मरण पत्र देऊन MPCB चंद्रपूर चा लक्षात आणुन दिले कि तुम्ही या लायडस मेटल कंपनीला नाहकत प्रमाणपत्र देतात. परंतु हे कंपनी चक्क लोह्याचे कण बाहेर सोडते.
या लोह्याचा कणामुळे मानवी जिवाला धोका निर्माण होऊ शकतो या लायडस मेटल कंपनी लोह्याचे कण बाहेर सोडते अशा कंपनीवर सक्त कारवाई करण्यात यावी जेने करून ही कंपनी घुग्घुस शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर करण्यात यावी अशी मागणी सुरेश मल्हारी पाईकराव यांनी केली चर्चा यावेळेस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर मा. भादुले सर यांनी आश्वासन दिले की कंपनीवर सक्त कारवाई करण्यात येईल.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.